Raju Shetti on CM Eknath Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti : राजू शेट्टींना सर्वात मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर 'स्वाभिमानी'च्या डझनभर नेत्यांनी सोडली साथ

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठी गळती लागली आहे. संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टींची साथ सोडली आहे. तिसरी आघाडी स्थापन केल्याने पहिल्या फळीतील डझनभर नेते नाराज होते.

Deepak Kulkarni

Swabhimani Shetkari Sanghatana News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच नेते राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाविकास आघाडी आणि महायुतीशी खटके उडाले होते. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी अखेर तिसरी आघाडी उघडत जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या.. पण दुसरीकडे शेट्टींचा हाच निर्णय त्यांच्या अंगलट आल्याचे दिसून येत असून अनेक पदाधिकारी चांगलेच नाराज झाले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला (Swabhimani Shetkari Sanghatna) मोठी गळती लागली आहे. संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टींची साथ सोडली आहे. तिसरी आघाडी स्थापन केल्याने पहिल्या फळीतील डझनभर नेते नाराज होते. दोन दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील हे शिवसेनेत दाखल झाले होते. तिसऱ्या आघाडीचा पर्याय आम्हाला अमान्य असल्याचं परिपत्रक काढत या नाराज नेत्यांनी काढलं आहे.

या सावकार मादनाईक,मिलिंद साखरपे,जनार्दन पाटील,वैभव कांबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांबाबत सहकारात्मक निर्णय घेत असल्याने महायुतीला आम्ही पाठिंबा देत असल्याचे परिपत्रक जारी केले आहे. मात्र, चळवळीचे काम पूर्ववत राहील,असा खुलासाही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

राजू शेट्टी यांचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट आल्याचं दिसून येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे(Swabhimani Shetkari Sanghatana) प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींना दिली सोडचिठ्ठी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तिसऱ्या आघाडीचे संधान बांधल्यामुळे अनेकजण नाराज आहे.

हे पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कारभारावर असमाधानी आहेत. त्यांनी शेट्टींची साथ सोडत या निवडणुकीत महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टींनी घटक पक्षांची जुळवाजुळव करत परिवर्तन महाशक्ती आघाडी उघडली आहे. या आघाडीद्वारे शेट्टी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

स्वाभिमानी संघटनेचं प्रसिध्दीपत्रक

यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रधान सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी एक प्रसिध्दीपत्रक काढलं आहे. त्यात ते म्हणतात, सावकार मादनाईक यांच्यासह तीन पदाधिकाऱ्यांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीस पाठिंबा दिले असल्याचे पत्रक काढले आहे.

तसेच स्वाभिमानी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्याही त्या पत्रकावर सह्या आहेत. या दोघांनी यापुर्वीच शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला असल्याने जालिंधर पाटील व जनार्दन पाटील या दोघांनाही पदमुक्त करण्यात आले आहे.

या दोघांनी महायुतीस पाठिंबा देणे म्हणजे हास्यास्पद आहे. तसेच उर्वरीत सावकर मादनाईक यांच्यासह तीन सदस्यांनी महायुतीस दिलेल्या पाठिंब्याच्या भुमिकेचा स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाचा कोणताही व कसलाही संबंध नाही. त्यांनी घेतलेला निर्णय तो फक्त वैयक्तिक आहे. स्वाभिमानी पक्ष हा परिवर्तन महाशक्ती आघाडीमध्ये सामील असल्याचं स्पष्ट मत अक्कोळे यांनी व्यक्त केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT