Mumbai News : विधानसभा निवडणुकीत माघार घेण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी काही तासांपूर्वीच जाहीर केला. काही दिवसांपासून मराठा, दलित-मुस्लिम असे समीकरण जुळवत निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेल्या जरांगेंनी अचानक माघार घेतल्याने तर्कवितर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी ‘साम टीव्ही’ला दिलेल्या खास मुलाखतीत सोमवारी पहाटे घडलेल्या घडामोडींनंतर माघार घेतल्याचे सांगितले. पहाटेपर्यंत काही मतदारसंघात निवडणूक लढण्याची जय्यत तयारीही सुरू होती, असे जरांगे पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे.
निवडणुकीतून माघार का घेतली, या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, निवडणूक लढवायची हे एका जातीवर शक्य नाही. मी दोन-तीन महिने यावर बोलत होतो. म्हणून मी 20-25 महिने कठोर मेहनत घेऊन हे समीकरण जुळवलं होतं. ज्या-ज्यावेळी आम्ही शब्द बोललो, ते खरेही केले आहेत. त्यामुळे आम्ही माघार घेतली, असे नाही. पण निवडणूक एक जातीवर जिंकणे अवघड आहे.
आमच्या बांधवांची (दलित-मुस्लिम) यादी आली नव्हती. ते रात्री, कालही आले होते. त्यांची पाच-सात नावं, आमचीही 13-14 किंवा 25 जरी असली तरी पेंडिंगच होती. आमची काही अशी नाराजी नाही. आमचा हा खानदानी धंदा नाही. एक इच्छा मात्र होती की, गोरगरिबांची चार-पाच, मराठ्यांचे दहा-पाच, दलित-मुस्लिमांचे चार-दहा जायला पाहिजे होते. त्यांनी गोरगरिबांचे प्रश्न मांडले असते.
आमची पहाटे तीन वाजता बैठक झाली. त्यात चर्चा झाली. आमचे मतदारसंघ ठरल्यानंतर आम्ही उमेदवार जाहीर करण्याचे ठरवले. ते उमेदवार कोण-कोण असतील, याची चर्चा सुरू झाली. त्यावेळेस मात्र, मध्येच विषय आला की, त्यांचीही नावे आली असतील, त्यांचीही नावे जाहीर करावी लागतील. त्यांच्या मतदारसंघात आपले फॉर्म असतील, तर काढून घ्यावे लागतील, अशी चर्चा झाली. पण तोपर्यंत नावेच आली नव्हती. त्यामुळे सकाळी लवकर नावे आली नाहीत, तर अवघड होईल, अशी चर्चा झाल्याचे जरांगे यांनी सांगितले. या घडामोडींनंतर जरांगे यांनी माघारीचा निर्णय जाहीर केला.
दलित-मुस्लिम उमेदवारांची नावे का आली नाहीत, यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, आंबेडकरांकडून दोन नावे आली होती. पण इतरांची नावे का आली नाहीत, माहिती नाहीत. तेही सामाजिक आहेत. त्यांचाही खानदानी राजकीय धंदा नाही. आम्ही प्रयत्न केला पण नाही जुळले. त्यात नाराज होण्यासारखे काही नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाणे आहे, मराठा, मुस्लिम आणि धनगरांना आरक्षण भेटल्याशिवाय शांत बसणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.