Kolhapur News : आमदार राजेश क्षीरसागरांच्या 500 एकरच्या आरोपाला स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट बिंदू चौकात येऊन प्रतिउत्तर दिले. राजेश क्षीरसागर यांनी 500 एकर जमीन माझ्या नावावर असल्याचं सिद्ध करावं. व तीच जमीन त्यांच्या नावे मी बक्षीस पत्र करून द्यायला तयार आहे, अशा शब्दांत राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी क्षीरसागर यांना आव्हान दिलं. यावेळी त्यांनी तब्बल दीड तास ठिय्या मारला. मात्र, आरोप केलेले राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर शेट्टी यांच्या या आव्हानाला कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी बिंदू चौकात तब्बल दीड तास ठिय्या मारला. मात्र, आरोप केलेले राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर शेट्टी यांच्या या आव्हानाला कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही.शक्तिपीठ महामार्गावरुन महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये जुंपली असताना आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता व्यक्तिगत पातळीवर आल्या आहेत.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी राजू शेट्टी यांच्यावर पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप केल्यानंतर राजू शेट्टी यांनी शनिवारी(ता.26) बिंदू चौकात येत आमदार क्षीरसागर यांच्यावरच निशाणा साधला आहे.
शिवसेना पक्षाच्या आमदारांची वाट बघत राजू शेट्टींसह शेकडो शेतकऱ्यांचा बिंदू चौकात ठिय्या मारला. यावेळी शेट्टी यांनी,500 एकर जमिनीचे पुरावे द्या. सगळ्या जमीनीचं बक्षीसपत्र क्षीरसागर यांच्या नावावर करून देण्याची राजू शेट्टी यांची भूमिका घेतली.
यावेळी राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात बिंदू चौकात जोरदार घोषणाबाजी केली. क्षीरसागर यांनी आरोप केला आहे, ते जबाबदार व्यक्ती आहेत. 2009 ला पहिल्यांदा आमदार झाले त्यापासून त्यांनी जी काय कमाई केली ते करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरला दान करावी, अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी क्षीरसागर यांच्याकडे केली.
शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करणारे नेते तकलादू आहेत हे स्पष्ट झाले आहे. संग्राम सिंह कुपेकरांनी समर्थनात जमा झालेले सातबारे नावे द्यावीत अशी माहिती मागवली होती. पण एक ही सातबारा जमा झालेला नाही असे पत्र तहसीलदारांनी दिले आहे. गडहिंग्लज चंदगड मधून शक्तिपीठ महामार्ग जात नाही. तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुश ठेवण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन मोर्चा काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.