Eknath Shinde: मोठी बातमी: फडणवीसांनंतर शिंदेही घेणार अमित शहांची भेट? शिरसाट, राठोड,कदम यांचं मंत्रिपद वाचणार?

Shivsena Political News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही लवकरच दिल्ली दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. या भेटीत महायुती सरकारमध्ये शिवसेनेतील तीन 'डेंजर झोन'मध्ये असलेल्या मंत्र्यावर ही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
amit shah eknath shinde devendra fadnavis
amit shah eknath shinde devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्टातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे जोरदार वारं वाहू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील मंत्र्‍यांवर गंभीर आरोप केले जात आहेत. तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे सभागृहात रमी खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं तर विरोधकांना टीकेसाठी आयतं कोलीतच मिळालं.

अशातच शुक्रवारी (ता.25) दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना नारळ देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हेही लवकरच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

महायुती सरकारमध्ये एकीकडे मंत्रिमंडळात मोठे फेरबदलाच्या संकेत दिले जात असतानाच दुसरीकडे आठ मंत्र्यांची विकेट पडणार असल्याची चर्चा आहे.या आठ मंत्र्यांमध्ये शिवसेनेच्या तीन मंत्रिमहोदयांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. त्यात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, गृहराज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्राचे वने, आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान,दोन्ही नेत्यांमध्ये महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांवरही चर्चा झाली. यावेळी फडणवीसांसमोरच शाह यांनी संबंधित मंत्र्यांच्या वर्तवणुकीवर संताप व्यक्त केला असल्याचीही माहिती आहे. याचमुळे आता या मंत्र्यांबाबत कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच संबंधित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून थेट डच्चू दिला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

amit shah eknath shinde devendra fadnavis
हर्षल पाटीलच्या आत्महत्याचे पडसाद कोकणात! थकीत बिलांविरोधात रत्नागिरीत कंत्राटदारांनी अधिकाऱ्याला घेरलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेही लवकरच दिल्ली दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. या भेटीत महायुती सरकारमध्ये शिवसेनेतील तीन 'डेंजर झोन'मध्ये असलेल्या मंत्र्यावर ही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यावेळी शिंदेंकडून शिरसाट, कदम, राठोड या आपल्या शिलेदारांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

शिरसाट यांचा एक व्हिडिओ

मंत्री संजय शिरसाट यांची एकापाठोपाठ एक प्रकरणं बाहेर निघाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला त्यांच्या मुलावर एका महिलेने फसवणुकीचे खळबळजनक आरोप केले होते. यानंतर मग शिरसाट यांच्या मुलाचा हॉटेल खरेदीचा मुद्दा तापला. या प्रकरणात नुकतीच फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याचदरम्यान, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर जमीन घोटाळ्याचेही गंभीर आरोप केले होते.

amit shah eknath shinde devendra fadnavis
Manikrao Kokate News : आता शरद पवारांनीच सूत्र हातात घेतली; वादग्रस्त कोकाटेंचा राजीनामा निश्चित?

काही दिवसांपूर्वी शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचं त्यांनी सांगितलं. स्वतः शिरसाट यांनीही हे मान्य केले. हे प्रकरण शांत होत नाही,तोच खासदार संजय राऊत यांनी शिरसाटांचा व्हिडिओ ट्विट केला. त्यात शिरसाट एका रुममध्ये बनियनवर बसले असून त्यांच्या बाजूला असलेल्या बॅगेत नोटांची बंडले दिसून येत असल्याचा आरोप झाला होता.

राठोडांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती, भाजपचाच आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या नागपूरचे भाजप आमदार संदीप जोशी यांनी संजय राठोड यांच्यावर धक्कादायक आरोप केले होते. त्यांनी राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आरोप केला होता. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना याबाबत पत्रही लिहिलं होतं.

amit shah eknath shinde devendra fadnavis
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंनीही केली तलवार म्यान; म्हणाले, ‘मी महाराजसाहेबांना (रामराजेंना) सर्व अधिकार दिले आहेत...’

मंत्री कदमांच्या आईच्या नावानं डान्सबार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं मुंबईत डान्सबार असल्याचा गंभीर आरोप केला होता. राज्यात डान्सबारवर बंदी असताना हा बार सुरू कसा? असाही प्रश्न परब यांनी केला.

आम्ही एफआयआरची प्रत काढली. त्यानंतर या बारचे परमिट कोणाच्या नावावर आहे लक्षात आले. ज्योती कदम या राज्यगृहमंत्र्यांच्या आई आहेत. संबंधित खात्याचे मंत्री तो व्यवसाय करू शकतात का, असा सवालही परब यांनी केला. परब यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

amit shah eknath shinde devendra fadnavis
Jalgaon Police : नुकतच अधिवेशनात प्रकरण गाजलं, अन् आता पोलिसांच्या हाती लागलं 60 कोटींचं घबाड

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन काळातचतीन दिवसांत मोठ्या कारनाम्यांनी महायुती सरकारमध्ये शिवसेना चांगलीच बॅकफूटला गेली होती. मंत्री संजय शिरसाट यांना आलेली आयकर विभागाची नोटीस,दुसऱ्याच दिवशी नोटांच्या बंडलासह त्यांचा बाहेर आलेला व्हिडिओ, आमदार संजय गायकवाडांची कॅन्टिन चालकाला मारहाण आणि भरसभागृहातच मंत्री शंभूराज देसाईंची अनिल परब यांना दिलेली धमकी तसेच वापरलेली शिवराळ भाषा यामुळे ऐन अधिवेशन काळातच एकनाथ शिंदे विरोधकांच्या निशाण्यावर आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com