Solapur, 15 August : राज्याचे आरोग्य मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांची आज सोलापूरमध्ये भेट झाली. दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती असून ही भेट राजकीय नव्हती, असे दोघांनीही या भेटीनंतर स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत, त्यामुळे राजू शेट्टी (Raju Shetti) आणि तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यातील भेटीची राजकीय वर्तुळात सुरू आहे. सोलापूमध्ये झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
माजी खासदार राजू शेट्टी आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात भेट झाली. दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व मानले जात आहे.
या भेटीबाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले, माझ्या बंधूंचे निधन झाल्याची माहिती राजू शेट्टी यांना नव्हती. ही बाब त्यांना समजल्यानंतर ते मला भेटण्यासाठी येत होते. सकाळी आमचा फोन झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की, मी सध्या गाणगापूरला जातोय. आपण सोलापूरमध्येच भेटूया. त्यानुसार राजू शेट्टींची भेट झाली आहे. ही कौटुंबीक भेट होती, असे स्पष्टीकरण तानाजी सावंत यांनी दिले.
राजू शेट्टी म्हणाले, आम्ही छोट्या छोट्या पक्षाच्या संपर्कात असून सर्वांना घेऊन काही आश्वासक चेहऱ्यांच्या माध्यमातून जनतेला एक सक्षम पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. सावंत यांच्या भेटीला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती.
सावंत यांच्या बंधूंचे निधन झाल्याची माहिती मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे उशिरा मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर मी त्यांना आपण सोलापुरात भेटूया, असे सांगितले, त्यानंतर आज आम्ही भेटलो. सावंत यांचे सांत्वन केले, बाकी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व प्रमुख पक्ष 2014 पणे स्वातंत्रपणे लढू शकतात, असे मोठे राजकीय विधानही राजू शेट्टी यांनी या वेळी बोलताना केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.