Kolhapur News, 29 May : राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहापटीने दरवाढ केली आहे. कृषीपंपाना जलमापक यंत्र ( पाणी मीटर ) बसविले जाणार आहेत. हे निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्यावतीने सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवतीनं वाढीव पाणीपट्टीविरोधात पुणे-बँगलोर महामार्ग रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं. आंदोलनावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी भेट घेऊन 6 जून रोजी बैठकीचे लेखी पत्र दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेत 6 जूननंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचं ठरलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजू शेट्टी म्हणाले, "एकीकडे सरकारनं शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तुघलकी निर्णय घेतले आहेत. शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. पाणीपट्टीत दहा पटीनं वाढ करणारे सरकार एफआरपीत मोडतमोड करून तुकड्यानं शेतकऱ्यानं ऊस बिले देत आहे. याबाबत सरकारनं मुग गिळून गप्प बसले असून पाणीपट्टी मात्र एक रक्कमी वसुलीचा तगादा लावला आहे. तोट्यातील शेतीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. त्यामुळे सरकारनं तातडीनं निर्णय घेऊन हे तुघलकी निर्णय मागे घ्यावेत."
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, आमदार सतेज पाटील, आमदार अरूण लाड, माजी आमदार संजयबाबा घाटगे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किणीकर यांच्यासह सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.