Loksabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही तिरंगी झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना ही निवडणूक दुरंगी झाली असती तर थेट फायदा झाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने हे पराभवाच्या भीतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर आरोप सुरू केले असल्याचे 'स्वाभिमानी' पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले.
धैर्यशील माने Dhairyasheel Mane यांना पराभव समोर दिसत असल्याने इस्मापूरमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच आपल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर आरोप सुरू आहेत, असा दावा 'स्वाभिमानी'चे प्रवक्ते अॅड. शमसूद्दीन संदे, जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, शिवाजी पाटील यांनी केला.यावेळी राजू शेट्टी हेच विजयाचे दावेदार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
साम दाम दंड भेद ही आयुध वापरूनही महायुतीच्या उमेदवाराला विजयाची खात्री नाही. त्यामुळे अपयशाचे खापर फोडण्यासाठी निशिकांत पाटील यांनी राजू शेट्टींचा प्रचार केल्याचा कांगाव केला जातो आहे. सर्व सामान्यांच्या जीवावर राजू शेट्टींनी निवडणूक लढली, असे अॅड. शमसूद्दीन संदे यांनी म्हटले आहे.
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
राजू शेट्टी Raju Shetti यांचा गेल्यावेळी पराभूत झाले मात्र ते मतदारांच्या संपर्कात होते. सामान्य मतदारांच्या, शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर ते लढले. निवडणूक लढवण्यासाठी सामान्य लोकांनी आर्थिक मदत केली. मात्र धैर्यशील माने यांनी 8200 कोटी रुपयांचा निधी दिल्याचा कांगावा केला; मात्र तरीही अखेरच्या टप्प्यात माने तिसऱ्या क्रमांकावर जाणार याची विरोधकांना जाणीव झाल्यानेच हे आरोप सुरू आहेत, असे देखील पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.