Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti : राजू शेट्टीचं अमित शाहांना पत्र, केली ही मागणी...

Sudesh Mitkar

Pune News : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व स्तरातून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.

सध्या राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट् या भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यात बळीराज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे राजू शेट्टींनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळं राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून संकटात आलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, असे राजू शेट्टींनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने पाहणी करून राज्य सरकारला प्रस्ताव सादर करावा आणि तातडीची मदत करण्याची मागणी अमित शाह यांच्याकडे केली आहे. तसेच नुकसानीमुळे कर्जाच्या बोजाखाली अडकून हतबल झालेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांना आधार देणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचं राजू शेट्टींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांप्रति सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी राजू शेट्टींनी यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT