पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetty : ठेकेदारांचे लाड करणाऱ्या सरकारने 'शक्तीपीठ'चा निधी दुष्काळासाठी वळवावा; राजू शेट्टींची मोठी मागणी!

Raju Shetty Demands Shaktipeeth Fund for Maharashtra Drought Relief : राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी शक्तीपीठ प्रकल्पाचा निधी वळवावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

Rashmi Mane

सुशांत सांगवे

Latur News : राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर होण्याची गरज आहे. पण दुष्काळाच्या मोठ्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍याला मदत करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसा नाही. मात्र मोठमोठ्या ठेकेदारांचे लाड सरकार करत आहे. गरज नसताना 'शक्तीपीठ'सारखा महामार्ग लादला जात आहे. हा महामार्ग आम्हाला नकोच आहे. सरकारने प्रथम 'शक्तीपीठ'चा निधी दुष्काळासाठी वळवावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

केवळ 'कमिशन'साठी हा महामार्ग करायचा असेल तर दुष्काळी भागात पाणी वळवून त्यातून 'कमिशन' घ्या, पण शक्तिपीठचा निधी दुष्काळासाठी घ्या, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. राजू शेट्टी हे लातूर दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर टीका केली.

आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्याने दुष्काळ जाहीर करून 'एनडीआरएफ'कडे अहवालही पाठवला आहे. अशीच स्थिती तमिळनाडूमध्येही आहे. पण महाराष्ट्र सरकार शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी अद्याप कुठलीही हालचाल करताना दिसत नाही. बघतो, माहिती घेतो, सर्वे करतो अशी उत्तरे महाराष्ट्र सरकार देत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सरकार केवळ प्रशासनावर अवलंबून असले की अशी अशीच वेळ येते. महाराष्ट्रात दुष्काळ असला तरी सरकारला जनतेची काहीही देणे-घेणे नाही. शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशी स्थिती असताना सत्ताधारी बैठकांमध्ये काजू, बदाम खात खाण्यात आणि डुलक्या घेण्यात व्यस्त आहेत. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिके जगवली. पण, पावसाने साथ न दिल्याने जोमदार आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. आता पाऊस पडला तरी त्याचा पिकांना फारसा उपयोग नाही. तेव्हा सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा. विम्याची संरक्षित रक्कम त्वरित शेतकर्‍यांना देण्याचे आदेश विमा कंपन्यांना द्यावेत. ज्या शेतकर्‍यांनी ट्रिगर बदलल्यामुळे विमा भरला नाही, अशा शेतकर्‍यांनाही तेवढीच मदत द्यावी. त्यानंतर दुष्काळाचा निधी देऊन शेतकऱ्यांना मोठा आधार सरकारने द्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीवेळी मदत करण्यात सरकार कमी पडले. त्यावेळी केलेल्या घोषणा अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. यंदाच्या दुष्काळाच्या स्थितीतही सरकार शेतकर्‍यांना मदत करण्यात कमी पडत आहे, असा आरोप शेट्टी यांनी शेवटी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT