Manoj Jarange Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Jarange Mumbai Morcha : राम मंदिर सोहळा अन् त्याचवेळी जरांगेंचा आरक्षण मोर्चा; धनंजय देसाईंच्या प्रतिक्रियेने खळबळ

Pradeep Pendhare

Manoj Jarange Patil Morcha Ahmednagar News :

हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी मराठा आरक्षणाच्या मोर्चावर मोठे भाष्य केले आहे. आरक्षण मुक्त भारताचे स्वप्न मी पाहत आहे. प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा संपूर्ण देशभरात जल्लोष सुरू आहे. असे असतानाच आरक्षणासाठी ही मोर्चाची वेळ नाही, असे मनोज जरांगे यांचे नाव न घेता धनंजय देसाई यांनी टिपणी केली आहे.

हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई हे नगरमध्ये होते. यावेळी त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शंकराचार्य यांच्या भूमिकेवर टीका करत मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चावर भाष्य केले.

Maratha Reservation वर भाष्य करताना धनंजय देसाई यांनी म्हणाले, "आरक्षण मुक्त भारताचे स्वप्न मी स्वतः पाहतो आहे. कुबड्या वाटतात म्हणून पाय तोडून धावणे चुकीचे आहे. श्रीरामाच्या चरित्रातून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभारले आहे". अशा वेळी राम मंदिराच्या माध्यमातून देशाचा जीर्णोद्धार होत असताना आरक्षण मोर्चाच्या निघाल्याने अनेकांची मने दुखावली गेली आहेत. 22 जानेवारी नंतरही या मोर्चाचा मुहूर्त त्यांना काढता आला असता, अशी टिपणी मनोज जरांगे यांचे नाव न घेता धनंजय देसाई यांनी केली.

धनंजय देसाई यांच्या या टिप्पणीवर सकल मराठा समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. मनोज जरांगे यांच्यावर टिपणी करून भाजप आणि त्यांच्या संघ परिवाराला हिंदू-मराठा, अशी दंगल घडवायची आहे. परंतु मराठ्यांनी हिंदू जगवला आहे, हे ते विसरले आहे. अयोध्येत जाणारे हे बहुजनांचे मुले होते. प्रभू श्रीराम आमचा सर्वांचा आहे. आस्था आहे. लहानपणी रामायण रडता-रडता पाहिले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा ज्या मंदिरात होत आहे, ते मंदिर पूर्णपणे उभारले आहे का, याचा विचार धनंजय देसाई यांनी आरक्षणाच्या मोर्चावर बोलण्याअगोदर केला पाहिजे. हिंदुत्वाचे ढोंग घेणाऱ्यांना समाजाविषयी काय समज असणार हा देखील संशोधनाचा विषय आहे, असे सकल मराठा समाजाने म्हटले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांची पदयात्रा पाथर्डी पोहोचली आहे. नगर तालुक्यातील बाराबाभळी येथे त्यांचा मुक्काम आहे. बाराबाभळी येथे एका मदरशा समोर असलेल्या दीडशे एकर पटांगणावर आज रात्री मनोज जरांगे आणि आंदोलक मुक्काम करणार आहे. नियोजनाची सकल मराठा समन्वय समितीकडून जय्यत तयारी सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मदरशा समोरील नियोजनाचा दाखल देत, धनंजय देसाई यांनी बाराबाभळी येथील मदरशावर येऊन पाहावे. मुस्लिम लोकांना कोणत्याच रंगाची अॅलर्जी नाही. रंगाची अॅलर्जी, हे त्यांच्या मनात आणि विचारात आहे. मदरशामध्ये शिक्षण घेत असलेले मुस्लिम मुले मराठा आंदोलकांसाठी उभे आहेत. त्यांच्याविरोधात लढायला लावता काय आम्हाला? दंगली घडवायच्या का? मनोज जरांगे यांच्या पदयात्रेत सहभागी झालेल्या मराठ्यांना पाहून स्वतःला हिंदुत्वावादी समजाणारे गडबडले आहेत. सत्ता दूर जात असल्याचे दिसू लागले आहे. त्यातून नगरमध्ये येऊन बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीने केला आहे.

आंदोलनाला गालबोट लागल्यास खबरदार...

हिंदू-मराठा, अशी दंगल घडवायची आहे. परंतु मराठ्यांनीच हिंदू जगवला आहे. अयोध्याला जाणारी बहुजनांची मुले होते. मराठ्यांची मुले होती. आज आम्ही हक्कासाठी लढतो आहे. मनोज जरांगे यांनी संपूर्ण आंदोलनात शांततेची पुरस्कार करत आहेत. यातून त्यांच्या लढाईचा निर्धार पक्का होत आहे. प्रभू श्रीराम आमच्या अस्थेचा, श्रद्धेचा भाग आहे. तो राहणाराच आहे. परंतु मनोज जरांगे आणि त्यांच्या मराठा आंदोलनाला काही गालबोट लागल्यास त्याचे पडसाद अयोध्येत देखील उमटतील, असा इशारा सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीकडून देण्यात आला आहे.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT