Manoj Jarange Patil Mumbai Morcha : सोलापुरातूनही मराठा बांधव मुंबईकडे रवाना; 'MIM'चा पाठिंबा,मुस्लिम ब्रिगेड मोर्चात...

Manoj Jarange Patil Marathi News : सोलापुरातून त्यांना मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजाकडूनही जरांगेंना पाठिंबा देण्यात आला आहे.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha
Manoj Jarange Patil Mumbai MorchaSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : मराठा आरक्षणासाठी अटीतटीच्या लढाईसाठी मुंबईला निघालेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातून हजारो मराठा बांधवही मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढाईला सोलापूरच्या ‘एमआयएम’नेही पाठिंबा दर्शविला आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे कार्यकर्तेही मोर्चात सहभागी झाले आहेत.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, यासाठी राज्य सरकारला वारंवार मुदतवाढ देऊनही आरक्षण न मिळाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत २२ जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपोषणाला बसणार आहेत. त्या उपोषण आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील हे आज जालन्याहून मुंबईला निघाले आहेत. त्यांना राज्यभरातून सर्वच जिल्ह्यातून पाठिंबा मिळत आहे. सोलापुरातून त्यांना मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजाकडूनही पाठिंबा देण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha
Maratha Aarakshan Mumbai Morcha : ... अन् मनोज जरांगेंच्या मायभूमीत पुन्हा एकदा दिवाळी!

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हजारो मराठा बांधव एकत्र जमले होते. त्या ठिकाणी महाराजांना अभिवादन करून हे सर्व मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यासाठी मुंबईकडे निघालेल्या मराठा समाजाला एमआयएम पक्षाच्या वतीने सोलापूर शहराध्यक्ष फारुक शाब्दी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडने मराठा आरक्षण आंदोलनाला नुसता पाठिंबा न देता त्यात सक्रीय सहभाग घेतला आहे. मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान व त्यांचे सहकारी या मोर्चात प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. मुंबईकडे निघालेल्या या सर्व मराठा बांधवांचा मुक्काम माढा तालुक्यातील अरण येथे होणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी पुढील वाटचालीस सुरुवात होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, माढा ,करमाळा, मंगळवेढा आदींसह सर्व तालुक्यांतून आणि शहरातून मराठा बांधव आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. या आरक्षण मोर्चामध्ये रवी मोहिते, माऊली पवार ,राजन जाधव,पुरुषोत्तम बरडे, अमोल शिंदे, आनंद जाधव, नागेश ताकमोगे, बालाजी वानकर, छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे मतीन बागवान, श्रीकांत डांगे, तात्या वाघमोडे आदींसह हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय! संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदारांसह अयोध्येस जाणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com