Ram Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राम शिंदे म्हणाले, पक्षानुसार शेतीला पाणी सोडणार आहेत का?

माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी नाव न घेता आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर टीका केली.

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - कुकडी प्रकल्प समितीच्या बैठकीत 25 मार्चला शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. या विरोधात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी कर्जतमध्ये मोर्चा व आंदोलन केले. या प्रसंगी माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी नाव न घेता आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर टीका केली. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्जत परिसरातील ऊस तोडणी होत नसल्याबाबत जाब विचारला. ( Ram Shinde said, according to the party, will they release water to agriculture? )

राम शिंदे म्हणाले की, कुकडी प्रकल्पातून वेळेवर पिकांना पाणी मिळाले असते तर आंदोलनाची आवश्यकता काय होती? अशा पद्धतीने लोकांना वेठीस धरायचं आणि चारीवर सांगतात हा कोणत्या पक्षाचा तो कोणत्या पक्षाचा. पक्षानुसार शेतीला पाणी सोडणार आहेत का? पक्षावर वीज देणार आहेत का? माझा कोणताही कारखाना नसताना कुणाच्या उसाचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही, असा टोला राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.

ते पुढे म्हणाले, तीन कारखान्यांवाल्यांमुळे उसाला तुरा आला. काय आहे उसाचे नियोजन. उसाला रिकव्हरी वाढली. याला कोण जबाबदार आहे. काय नियोजन आहे. 12 महिने लोक कष्ट करतात. त्यानंतर तुम्ही हा त्रास देता. नोव्हेंबर महिन्यात हंगाम चालू झाला आणि कारखान्याने बैठक मागील महिन्यात कशी घेतली. शेतकऱ्याला ऊस तोडण्यासाठी एका एकराला 7 हजारापासून 16 हजार रुपये द्यावे लागतात.

उजनी प्रकल्पाचे सगळे शेतकरी अडचणीत आहेत. उस तोडला जात नाही. जाणून बुजून बाहेरच्या कार्यक्षेत्रातील ऊस आणला जातो. उसाचे वय संपलं, तुरा पडला, रिकव्हरी वाढली, वजन घटलं, शेतकऱ्याचे नुकसान होते की नाही. मी मंत्री असताना जिथे जिथे ऊस जास्त झाला होता तेथे साखर आयुक्तांची बैठक घेऊन सर्व कारखान्यांना कोटा वाटून दिला होता. आता अशी परिस्थिती का निर्माण होते, असा प्रश्नही राम शिंदे यांनी उपस्थित केला.

रोहित पवारांची खेळी अन् जयंत पाटलांचे आश्वासन

माजी मंत्री राम शिंदे कुकडीच्या प्रश्नावर आंदोलन करणार हे तीन दिवसांपासून निश्चित होते. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून कर्जतमध्ये तयारी सुरू होती. अशाच काल ( मंगळवारी ) आमदार रोहित पवार यांनी मुंबईत जयंत पाटील यांची भेट घेऊन कुकडीच्या पाणी आवर्तनाबाबत चर्चा केली. या वेळी जयंत पाटील यांनी 18 मार्चपर्यंत कुकडीचे आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे राम शिंदेच्या आंदोलना आधीच रोहित पवार यांनी तोडगा काढल्याची चर्चा अहमदनगर जिल्ह्यात होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT