Ram Shinde Vs Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'राम शिंदेंनी आधी राजीनामा द्यावा आणि मग रोहित दादांचा राजीनामा मागावा'

आमदार राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांना आव्हान दिले होते.

नीलेश दिवटे

Rohit Pawar Vs Ram Shinde : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांना आव्हान दिले होते. त्यात त्यांनी रोहित पवार यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्यास सांगितले होते. यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कर्जत तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांनी आमदार राम शिंदे यांनाच प्रतिआव्हान दिले आहे.

नितीन धांडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, विधानपरिषदेवर गेल्यापासून आमदार राम शिंदे हे आमदार रोहित पवार यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढविण्याचे आव्हान देत आहेत. आमदार रोहित पवार यांना मागील विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडच्या सुज्ञ मतदारांनी विक्रमी मतांनी निवडून दिले उलट आमदार शिंदे हेच मागच्या दाराने आमदार झालेत. त्यांनी आधी आपल्या आमदार की चा राजीनामा द्यावा आणि मगच रोहित दादांचा राजीनामा मागावा. तेंव्हा निवडणुकीत कळेल कोण किती जनतेत आहे?, असे आव्हान धांडे यांनी दिले आहे.

त्यांनी पुढे म्हंटले आहे की, विधानपरिषदेमध्ये मागच्या दाराने प्रवेश करणारे आमदार राम शिंदे यांचा गेल्या निवडणुकीमध्ये तब्बल 42 हजार मतांनी दारुण पराभव झालेला आहे. त्यांची कार्यपद्धती सर्वांना ज्ञात आहे. अधिकारी गुन्हेगार असल्यासारखी त्यांच्या बरोबर वागण्याची पद्धत, सामान्य नागरिकांना, मतदारांना कमी लेखण्याचा नेहमीचा तोरा या सर्व गोष्टीमुळेच कर्जत-जामखेडमधील नागरिक आणि जनतेने त्यांचा दारुण पराभव केलेला आहे. उलट आमदार रोहित पवार यांनी जनसामान्याचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आणि नागरिकाशी नाळ जोडण्याचे काम, विकासकामांच्या माध्यमातून विश्वास संपादित करण्याचे काम आमदार पवार यांनी केले आहे. अभ्यासू,संमयी तसेच दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून ते सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.मात्र विधान परिषदेवर गेल्यापासून वारंवार आमदार रोहित पवार यांना राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याचे आव्हान देण्याचे काम राम शिंदे करत आहेत.

राम शिंदे यांचे गाव असलेल्या चौंडीतील ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात ठेवण्यात अपयश आले. महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल डिझेलचे दर प्रचंड वाढलेत ते कमी करण्याचा सल्ला शिंदे आणि फडणवीस सरकारला त्यांनी द्यावा, महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार रोहित पावर यांनी भरीव निधी आणला याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कौतूक सध्याच्या सरकार मधील मंत्री-आमदार करीत आहेत. हे कशाचे प्रतीक आहे?,सध्या शिंदे आणि फडणवीस सरकार मध्ये आमदार शिंदे यांनी आपले वजन वापरीत कर्जत तालुक्यासह मतदारसंघात भरीव निधी आणून प्रलंबित कामे मार्गी लावावीत,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी -कार्यकर्ते विरोध न करता स्वागतच करतील. राम शिंदेंमध्ये खरंच धमक आहे तर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा आणि मग रोहित पवारांचा राजीनामा मागावा. मग समोर निवडणूक झाल्यावर कळेल की तुम्ही किती जनतेत आहेत आणि आमदार रोहित पवार किती जनतेमध्ये आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

त्यांनी कर्जत जामखेड मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ विकास आराखडा, गीते बाबा, सीताराम गड, अष्टविनायक पैकी एक क्षेत्र सिद्धटेक, राशीन देवी, पाणंद रस्ते आदी सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या कामना स्थगिती दिली असून बहुतेक त्याचे श्रेय घेण्याचा डाव असावा असा टोला नितीन धांडे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT