Minister Ramdas Athawale
Minister Ramdas Athawale facebook
पश्चिम महाराष्ट्र

वानखेडेंची नोकरी का, मलिकांचे मंत्रीपद जाते, हे बघुया !

हेमंत पवार

कऱ्हाड : एनसीबीने आर्यनवर केलेल्या कारवाईत पक्षांनी आरोप करण्याचे काहीच कारण नाही. एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे आर्यनवर कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयानेही त्याला जामीन दिलेला नाही. त्यामुळे एनसीबीकडे भरपुर पुरावे आहेत, असा अर्थ होतो. मंत्री नबाव मलिक जर अधिकाऱ्यांवर आरोप करत असतील तर समीर वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिक यांचे मंत्रीपद हे बघुया, असाही टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज शनिवारी कऱ्हाड (जि. सातारा) येथे लगावला.

आरपीआयचे येथील (कै) युवराज काटरे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी मंत्री आठवले कराडात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते. ईडीच्या कारवायांबाबत मंत्री आठवले म्हणाले, केंद्र सरकारची विनाकारण कोणाला त्रास देणे हा हेतु नाही. ज्या ठिकाणी अनियमीतता होते तेथे एनसीबी कारवाई करते, चौकशी करते. आदरणीय शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. इडीकडुन पवारांचे कुटुंब म्हणुन त्रास दिला जात नाही. ती चौकशी स्वतंत्ररित्या होत असते, त्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही. केंद्र सरकारने पवार कुटुंबीयांना त्रास द्या असे आदेश दिलेले नाहीत. ओबीसी आरक्षण न्यायालयाने रद्द केले आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मिळावे ही आमच्या पक्षाची भुमिका आहे. केंद्रामधुन काही होवु शकते का याचा विचार आम्ही करत आहोत.

ते म्हणाले, एनसीबीने आर्यनवर केलल्या कारवाईत पक्षांनी आरोप करण्याचे काहीच कारण नाही. एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे आर्यनवर कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयानेही त्याला जामीन दिलेला नाही. त्यामुळे एनसीबीकडे भरपुर पुरावे आहेत, असा अर्थ होतो. त्यानंतर एनसीबीने अनेकांना धडाधड अटक केली आहे. एनसीबी ही स्वतंत्र व्यवस्था आहे. सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर ड्रगचे स्मगलींग करुन फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुरवठा केला जातो हे पुढे आले. मंत्री नबाव मलिक जर अधिकाऱ्यांवर आरोप करत असतील तर समीर वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिक यांचे मंत्रीपद हे बघुया, असाही टोला त्यांनी लगावला.

शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे....

मंत्री आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवीन कृषी कायदे आणले आहेत. ज्या शेतकऱ्यानी त्यांन सत्तेवर आणले आहे, त्यांच्या विरोधात ते कायदे करणार नाहीत. एक कायदा मागे घेतला तर अनेक कायदे मागे घ्यावे लागतील. सरकारसोबत त्यांनी मागण्यासंदर्भात चर्चा करावी. सगळे कायदे मागे घ्या, ही मागणी बरोबर नाही. हे कृषी कायदे मागे घेतले तर प्रत्येकवेळी आंदोलन होईल आणि कायदे मागे घेण्याची मागणी केली जाईल. त्यामुळे पार्लमेंटच्या निर्णयाला, मंत्रीमंडळाच्या निर्णयाला काही अर्थ राहणार नाही. शेतकऱ्यांबद्दल केंद्र सरकारला सहानुभुती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे.

मनसेला सोबत घेतल्यास नुकसानच....

मुंबई महापालिका निवडणूक जिंकणे महत्वाचे आहे. त्यासाठी आरपीआय भाजपसोबत राहणार असुन मुंबईतील दलित मतांचा भाजपला चांगला फायदा होईल. मात्र, भाजपने मनसेला सोबत घेतल्यास नुकसान होणार आहे. भाजपने आरपीआयला ताकद दिली तर १०० हुन अधिक जागा मिळतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केला. ते म्हणाले, राज्यातील पंधरा महापालिकांची निवडणुक लवकरच होत आहे. त्यामध्ये भाजपसोबत आरपीआय युती करणार आहे. मुंबई महापालिका निवडणुक जिंकणे महत्वाचे आहे. त्यासाठी आरपीआय भाजपसोबत राहणार आहे. त्यामुळे दलीत मते मिळुन त्याचा भाजपला चांगला फायदा होणार आहे. मात्र मनसे ला सोबत घेतल्यास भाजपचे नुकसान होणार आहे. आरपीआयला ताकद दिली तर महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा अशी घोषणा झाल्यास दलीत मतदार आमच्याबाजुने उभे राहतील आणि १०० हुन अधिक जागा मिळतील.

बैलगाड्यांच्या शर्यतीला परवागी द्यावी...

मंत्री आठवले म्हणाले, बैलगाड्यांच्या शर्यती होतच असतात. कोरोना असल्यामुळे त्यावर काही ठिकाणी बंदी आणण्यात आली आहे. अनेक ठिकाणी गर्दी होते. त्यामुळे बंदी केली आहे. ग्रामीण भागात बैलगाड्यांची स्पर्धा होते. त्याला परवानगी द्यायला हाकरत नाही. बंदी असेल तर राज्य सरकारने कोरोना संपल्यानंतर बैलगाड्यांना परवानगी दिली पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT