अमित शहा आणि शरद पवार येणार एकाच व्यासपीठावर

२१ पारितोषिक पटकावून महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळवले.
Sharad Pawar- Amit Shaha
Sharad Pawar- Amit Shaha Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : सहकारी साखर कारखानादारीच्या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील यंदाच्या वर्षांसाठीची (२०२१) गुणवत्ता पारितोषिके जाहीर करण्यात आली. त्यामध्ये २१ पारितोषिक पटकावून महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळवले. हा पारितोषक वितरण कार्यक्रम 16 नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. नव्याने स्थापन झालेल्या सहकार खात्याचे मंत्री अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, रस्ते व परिवहन विकास मंत्री नितिन गडकरी, वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमा निमित्ताने पवार आणि अमित शहा एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

Sharad Pawar- Amit Shaha
भाजप लढणार उपाध्यक्ष पदाची निवडणूक, नितीन गडकरी घेणार निर्णय...

कोरोना साथीमुळे गेल्यावर्षी पारितोषिक वितरण होऊ शकले नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षीची व या वर्षाची पारितोषिके एकाच वेळी वितरीत करण्यात येणार आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट 'वसंतदादा पाटील पुरस्कार' भाजप आमदार प्रशांत परिचारक अध्यक्ष असलेल्या सोलापूरच्या श्री पांडुरंग कारखान्याला मिळाला आहे. यंदा देशातील २८४ पैकी १०८ सहकारी साखर कारखान्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी आज (ता. २३ ऑक्टोबर) या पारितोषकांची घोषणा केली. देशातील १०८ सहकारी कारखान्यांचे यानिमित्ताने विविध निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले.

महाराष्ट्रातील ४६ कारखाने यात सहभागी होते. मूल्यमापनासाठी सरासरी दहा टक्के व त्याहून अधिक साखरेचा उतारा असलेले आणि दहा टक्क्यांपेक्षा कमी उतारा असलेले कारखाने दोन गटात वर्गवारी करून मूल्मापन करण्यात आले. तसेच यंदा एका कारखान्याला एकच पारितोषिक असा मापदंड लावून हे मूल्यमापन सर्वसमावेशक करण्यात आले.

Sharad Pawar- Amit Shaha
फडणवीसांनी माहिती दडविल्याच्या प्रकरणात निवडणूक अधिकाऱ्यांना समन्स...

पारितोषकांचे मानकरी

१) देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना 'वसंतदादा पाटील पुरस्कार' श्रीपांडुरंग कारखाना, सोलापूर.

२) ऊस विकास व उत्पादकता प्रथम पारितोषिक श्रीदत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ, कोल्हापूर. द्वितीय पुरस्कार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना सांगली.

३) तांत्रिक कार्यक्षमता विघ्नहर सहकारी साखर कारखाना, पुणे. द्वितीय पुरस्कार डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखाना, सांगली.

४) विक्रमी ऊस गाळप जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर.

५) विक्रमी ऊस उतारा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा.

६) अत्युत्कृष्ट सहकारी साखर कारखाना श्री छत्रपति शाहू सहकारी साखर कारखाना, कागल, कोल्हापूर.

७) विक्रमी साखर निर्यात प्रथम विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, पिंपळनेर. द्वितीय सह्याद्रि पांडुरंग कारखाना, सोलापूर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com