Kolhapur News : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे. याचाच प्रत्यय गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्येही दिसून आला. तसेच या निवडणुकीमुळे कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातील डाव -प्रतिडावही पाहायला मिळाले.अखेर गोकुळमधील माजी मंत्री आणि काँग्रेसच्या सतेज पाटलांचं राजकारण मोडून काढत महायुतीचा अध्यक्ष बसवण्यात आला. गोकुळच्या राजकारणाचा धुरळा बसण्याआधीच कोल्हापुरात जाऊन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सतेज पाटलांचं (Satej Patil) नाव घेत नवा बॉम्ब फोडला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सोमवारी (ता.16) कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या राजकारणातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा असलेल्या सतेज पाटलांबाबत मोठं विधान केलं. त्यांनी डी.वाय.पाटील यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचं सांगितलं.
तसेच आठवले म्हणाले, डी.वाय पाटील यांची भेट घेण्यासाठी आल्यावर तिथे सतेज पाटील असतील, तर ते आमचे मित्र आहेत. आम्ही यापूर्वी काँग्रेसमध्ये होते,आता मी भाजपसोबत आहे. पण आताच्या घडीला कोण कोणासोबत जाईल सांगता येत नसल्याचं वक्तव्य करत आठवलेंनी कोल्हापूरच्या राजकारणात नवा बॉम्ब टाकला आहे.
रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) यावेळी आगामी निवडणुकीत आरपीआयला जास्तीत जास्त जागांवर संधी द्यावी, अशी मागणी करत भाजपबाबत पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी युती म्हणून तर काही ठिकाणी स्वतंत्र लढायचे झाल्यास लढणार आहे. भाजपने जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील जागा द्याव्यात.
भाजपमधून आम्हाला जागा मिळणार आहेत,त्यांनी त्या द्याव्यात.मी सत्तेसोबत असल्याने माझा पक्ष देशांत वाढला. पण आरपीआयला एक ही जागा दिली जात नाही. आरपीआयला डावलून चालणार नाही. सत्तेवर यायचं असेल तर आरपीआयलासोबत ठेवले पाहिजे. कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं हे आरपीआय छोटा पक्ष असला तरी ठरवू शकतो,असा इशाराही मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सतेज पाटील यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सतेज पाटील यांना देखील त्याची जाणीव झाली असून त्यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना भावनिक आवाहन केले आहे.
'कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मी गेले 20 ते 25 वर्षे कार्यरत आहे. राजकारणात प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. कोणत्या तरी ‘पंचवार्षिक’ला सगळे माझ्यासमवेत असतात. एखाद्या पंचवार्षिकला मी एकटा असतो. आता एकटा आहे. तुम्ही सारे सोबत आहात ना,’ अशी भावनिक साद आमदार सतेज पाटील यांनी घातली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. . महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सर्व मिळून सामोरे जाऊया. गडहिंग्लज नगरपालिकेची निवडणूक जनता दलासह सर्वजण मिळून लढूया. माणूस तेव्हाच यशस्वी होतो, जेव्हा तो चांगले वागतो, चांगले बोलतो. कदाचित यश वेळाने मिळेल, पण चांगल्या माणसाला यश मिळतेच, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.