Ramraje Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विरोधक करून करून काय करतील; माझी 'ईडी'ची चौकशी लावतील....

आगामी नगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने माझे तिकिट फिक्स आहे, असे कुठल्याही नगरसेवकाने समजू नये. मी माझ्या पध्दतीने ते फिक्स करणार आहे, असे रामराजेंनी स्पष्ट केले.

किरण बोळे

फलटण शहर : आगामी नगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने माझे तिकिट फिक्स आहे, असे कुठल्याही नगरसेवकाने समजू नये. मी माझ्या पध्दतीने ते फिक्स करणार आहे. कार्यकर्त्यांनी जपून राहावे, काही अडचण आली तर मला फोन करावा. विरोधक करुन करुन काय करतील, तर माझी 'ईडी'ची चौकशी लावतील. परंतु, मी त्याला घाबरत नाही, असा टोला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना लगावला आहे.

दरम्यान, रामराजे यांच्या या इशाऱ्याने अनेक इच्छुकांना गुदगुल्या झाल्या तर काहींना घाम फुटला असुन या निवडणूकीत कुणाची विकेट पडणार, याची चर्चा आतापासुनच झडू लागल्या आहेत. फलटण नगरपरिषदेच्या नवीन क्रेन तसेच विविध विकास कामांची भूमिपूजन व उद्घाटने सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्षा निता नेवसे उपस्थिती होते.

कार्यकर्त्यांनी जपून राहावे, काही अडचण आली तर मला फोन करावा. विरोधक करुन करुन काय करतील तर माझी 'ईडी'ची चौकशी लावतील. परंतु, मी त्याला घाबरत नाही, असे सांगून रामराजे म्हणाले, 21 व्या शतकातील आधुनिक फलटण करण्याचा मी शब्द दिला होता, त्याप्रमाणे टप्याटप्याने फलटणची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू आहे. त्यानुसार मटण मार्केट मच्छी मार्केटची उभारणी चालू आहे. त्याच धर्तीवर शहरात इतरही ठिकाणी आधुनिकतेची कामे चालू आहेत. भुयारी गटार योजना पूर्ण होत आली असून सर्व रस्ते रस्त्यांची कामे सुरू होतील. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न येत्या काही दिवसांत सोडवू, असे रामराजे यांनी यावेळी सांगितले. तसेच आगामी नगरपालिका निवडणुकीत मंगळवार पेठेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

यावेळी नगरसेवक पांडूरंग गुंजवटे, अजय माळवे, विक्रम जाधव, सनी अहिवळे, बाळासाहेब मेटकरी किशोरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, वैशाली अहिवळे, मधुबाला भोसले, सुवर्णा खानविलकर, प्रगती कापसे, वैशाली चोरमले, ज्योत्स्ना शिरतोडे, दिपाली निंबाळकर, रंजना कुंभार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्याला हात लावाल तयार याद राखा....

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या कार्यकर्त्यांना विरोधकांचे फोन येऊ लागले आहेत. त्यांना बोलविण्यात येत आहे. धमक्या दिल्या जात आहेत, पण माझ्या कार्यकर्त्यांना कोणी जर हात लावला, तर मी काही गप्प बसणार नाही, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT