ramraje naik nimbalkar-ranjitsinh naik nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramraje Vs Ranjitsinh : रणजितसिंह निंबाळकरांसोबतच्या मनोमिलनाबाबत रामराजेंचे मोठे विधान; 'निवडणुका लागू द्या मग...'

Phaltan Political News : फलटणच्या रणजितसिंह आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मनोमिलनाच्या चर्चेला रामराजेंनी प्रतिसाद दिला. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे सांगून त्यांनी चेंडू वरिष्ठ नेत्यांकडे ढकलला.

Vijaykumar Dudhale
  1. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील संघर्षानंतर आता मनोमिलनाची चर्चा सुरू झाली आहे.

  2. विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह समर्थक सचिन पाटील विजयी झाल्याने रामराजे गट बॅकफूटवर गेला आहे.

  3. रामराजे यांनी स्पष्ट केले की, मनोमिलन वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे आणि ते विकासाच्या राजकारणावर आधारित असावे.

Satara, 03 October : फलटणच्या राजकारणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातून विस्तवही जात नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोन कट्टर राजकीय नेत्यांच्या मनोमिलनाची चर्चा साताऱ्याच्या राजकारणात रंगली आहे. त्यावर ज्येष्ठ नेते रामराजे यांनी जाहीरपणे भाष्य केले आहे. ‘मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नसतं. वरिष्ठांनी सांगितलं तर होईल नाहीतर होणार नाही,’ असे सांगून मनोमिलनाबाबतचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात ढकलला आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी आतापर्यंत फलटणच्या राजकारणावर वर्चस्व राखले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मानणारे सचिन पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांनी रामराजे गटाचे उमेदवार दीपक चव्हाण यांचा पराभव केला होता.

खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी लोकसभा निवडणुकीच्या वेळी सभेत जाहीर केली होती. पण रामराजे यांनी अजित पवार यांची साथ सोडून दीपक चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र, रामराजेंचा तो डाव उलटा पडला. तेव्हापासून रामराजे हे फलटणच्या (Phaltan) राजकारणात बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी रामराजे यांनी एका कार्यक्रमात बोलताना रणजितसिंह आणि आमच्यात संघर्ष आहे. पण, तुमची काय अपेक्षा आहे, आम्ही काय एकमेकांच्या कॉलरी धरायच्या का? कुठे थांबायचे हे आम्हा दोघांनाही कळंत, असं विधान केलं होतं. त्यामुळे फलटणच्या राजकारणात निंबाळकर आणि रामराजे गट यांच्यात मनोमिलन होणार, अशी चर्चा रंगली होती. त्यावर निंबाळकरांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आता खुद्द रामराजेंनीच त्याबाबत भाष्य केले आहे.

‘ते काय म्हणाले की विकासाच्या कामात मध्ये येऊ नका. विकासाच्या कामात आम्ही मध्ये येतोय होय. उलट आम्ही केलेल्या कामात यांचं काय...असं म्हणत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुका लागू द्या मी बोलेन काय बोलायचे ते, असे सूचक भाष्य केले.

मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. सत्तेचं राजकारण करायचं म्हटलं तर विचार करण्यात येईल. वरिष्ठांनी सांगितलं तर होईल नाही तर होणार नाही, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महायुतीचे पक्षश्रेष्ठी यांच्या कोर्टात रामराजेंनी चेंडू ढकलला आहे.

प्रश्न 1 : फलटणमध्ये कोणत्या दोन नेत्यांच्या मनोमिलनाची चर्चा आहे?
रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर.

प्रश्न 2 : विधानसभा निवडणुकीत रामराजे गटाला कोण पराभूत झाले?
दीपक चव्हाण, ज्यांना सचिन पाटील यांनी हरवले.

प्रश्न 3 : रामराजेंनी मनोमिलनाबाबत काय सांगितले?
वरिष्ठांनी सांगितले तर मनोमिलन होईल, नाहीतर नाही.

प्रश्न 4 : रामराजेंनी कोणत्या प्रकारच्या राजकारणावर भर दिला?
विकासाच्या राजकारणावर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT