-अंकुश चव्हाण
Khatav political News : मी गेली तीस वर्षे फक्त पाण्यासाठी काम केले. जिल्ह्यातील सगळे दुष्काळी भाग एकत्र करून कुठे काय राहिले आहे. याचा राजकारण सोडून आढावा घेऊ. दुष्काळी भागात पाणी येणे हा एक टप्पा आहे, तर त्यावर शेती पिकावर प्रोसेसिंग करणारे कारखाने तयार करणे हा दुसरा टप्पा. या सर्वांचे विचारमंथन होणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
खटाव तालुक्यातील Khatav Taluka मायणीतील अंतर्गत रस्त्याच्या भूमिपूजनावेळी रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar बोलत होते. त्यावेळी जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे, अर्जुन खाडे, बंडा गोडसे, रघुनाथ घाडगे, मायणीच्या सरपंच सोनाली माने, उपसरपंच दादासो कचरे आदी उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, या देशात ७० वर्षांची लोकशाही टिकून आहे, ती सर्वसामान्य माणसातील श्रद्धाळूपणामुळेच. माणूस हा धार्मिक व सहिष्णू आहे. श्रद्धेच्या माध्यमातून समाजाचा समतोल कायम टिकून राहावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.
पाणीप्रश्नावर रामराजे म्हणाले, मी गेली तीस वर्षे फक्त पाण्यासाठी काम केले, तर पाण्याबाबत जिल्हातील सगळे दुष्काळी भाग एकत्र करून कुठे काय कमी-जास्त आहे, ते बघून घेऊ. याचा राजकारण सोडून आढावा घेऊ.
दुष्काळी भागात पाणी येणे हा शेतकऱ्यांच्या जीवनातील एक टप्पा आहे, तर त्यावर शेती पिकावर प्रोससिंग करणारे कारखाने तयार करणे हा दुसरा टप्पा आहे. यासाठीही प्रयत्न व विचारमंथन व्हायला हवे, असे रामराजे म्हणाले.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.