MLA Anil Babar News, Late Ramrav Pawar News, MLA Anil Babar on Late Ramrav Pawar
MLA Anil Babar News, Late Ramrav Pawar News, MLA Anil Babar on Late Ramrav Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

रामराव पवारांनी राजकीय ऑफर धुडकावली होती...

संजय जगताप

मायणी : सेवानिवृत्तीनंतर अनेक बडे अधिकारी या ना त्या राजकीय पक्षाच्या वळचणीला जातात. मात्र, रामराव पवार यांनी आलेली राजकीय ऑफर धुडकावून सर्वसामान्यांसाठी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले, असे प्रतिपादन खानापूर आटपाडीचे आमदार अनिलराव बाबर यांनी केले. (MLA Anil Babar on Late Ramrav Pawar)

माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक रामराव पवार यांना चितळी ( ता. खटाव) येथे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात श्री. बाबर बोलत होते. त्यावेळी ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पवार, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, इंद्रजीत देशमुख, रयतच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आबासाहेब देशमुख, सुरेंद्र गुदगे, रणजीतसिंह देशमुख, नंदकुमार मोरे, धैर्यशील कदम, डॉ. सयाजीराव पवार आदी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एका चांगल्या अधिकाऱ्याला आपण मुकलो असल्याचे स्पष्ट करून आमदार बाबर म्हणाले, ''रामराव पवारांना कधीही सत्तेचा व वर्दीचा गर्व नव्हता. त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठीच काम केले. एका प्रकरणात तर मला पुढाकार घेऊन घरगुती वाद संपाविण्यास सूचित केले. कायद्याच्या पलीकडे जाऊन लोकांची मदत करण्याचा त्यांचा संवेदनशील स्वभाव होता.''

प्रभाकर घार्गे म्हणाले, ''निवृत्तीनंतर पुण्या मुंबईत स्थायिक न होता त्यांनी आपल्या गावात राहून सामाजिक बांधिलकी जपली.'' इंद्रजीत देशमुख म्हणाले, ''एखाद्या माणसाला जीव कसा थ ने. प्रेम कसे करावे याचे रामकाका मूर्तिमंत उदाहरण होते.'' सुरेंद्र गुदगे म्हणाले, गाव व परिसराच्या विकासासाठी झटणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याना काकांनी नेहमीच पाठबळ दिले.

डॉ. सयाजीराव पवार म्हणाले, ''पोलीस अधिकारी असूनही ते मनाने खूप हळवे, संवेदनशील होते. गावातील सर्व मंदिरांचा जीर्णोध्दार त्यांच्या पुढाकारामुळेच झाला.'' रणजीतसिंह देशमुख, नंदकुमार मोरे, धैर्यशील कदम,आदींनी पवार यांच्या कार्य कर्तृत्वाचा आलेख श्रध्दांजलीतून मांडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT