Ranjitsinh Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटलांनी सांगितली शंकर कारखान्याची विदारक स्थिती; ‘त्यावेळी जनरेटर दुरुस्तीसाठी दीड लाखसुद्धा नव्हते; पण...’

Shankar Sugar factory Annual meeting : आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सांगितले की, केंद्र आणि राज्य नेतृत्वाच्या सहकार्यातून 113 कोटींचे कर्ज मिळाले आणि कारखाना पुन्हा सुरू झाला.

सुनील राऊत
  1. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला ११३ कोटी रुपयांचे कर्ज मिळाले.

  2. आतापर्यंत ७१ कोटी शासकीय देणी, बँक, कर्मचारी, वाहतूक यावर आणि ४२ कोटी मशिनरी दुरुस्तीसाठी खर्च झाले.

  3. शेतकऱ्यांची संमतीशिवाय शेअरची रक्कम वसूल होणार नाही आणि ऊसाचे वजन मोफत काट्यावर केले जाणार आहे.

Natepute, 30 September : भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत कारखान्याचा आढावा घेतला. तो घेताना शंकर साखर कारखाना पाच वर्षे बंद होता. जनरेटर दुरुस्त करण्यासाठी दीड लाख रुपये सुद्धा नव्हते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून 113 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आणि त्यातून कारखान्याची चाके फिरली, असे कारखान्याचे अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची (Shankar Sugar Factory) 58 वी वार्षिक सभा कारखान्याचे अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या सभेत अध्यक्ष मोहिते पाटील यांनी शंकर साखर कारखाना सुरू करण्यासाठी भाजप नेत्यांकडून मिळालेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला.

रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यामुळे श्री शंकर साखर कारखान्याला ११३ कोटी रुपयांचे कर्ज मिळाले. शासकीय देणी, बॅंक, कर्मचारी, वाहतूक आदींसाठी ७१ कोटी आणि मशिनरी दुरूस्तीसाठी आजपर्यंत ४२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. अशा कठीण परिस्थितीत आपण जुनी देणी, जुने कर्ज आणि मशिनरी दुरुस्तीसाठी एकूण ११० कोटी रुपये खर्च करू शकलो आहोत.

गाळप झालेल्या उसाच्या बिलातून शेअरची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय वसूल केली जाणार नाही. कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये. या वर्षी उसाच्या लागवडीत वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस शंकर कारखान्यालाच पाठवावा, असे आवाहनही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले.

शंकर साखर कारखान्याकडून उत्पादीत झालेल्या साखरेचे वजन, उसाचे वजन एकाच काट्यावर केले जाते. मोरोची येथे नवीन वजन काटा उभारला आहे .सर्व ऊस गाड्यांचे मोफत वजन करून मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले

आमदार उत्तमराव जानकर म्हणाले, सगळी पिके पाण्यात गेलेली आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळे एक दिवसाचे अधिवेशन बोलवावे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास वेळप्रसंगी उपोषणही करणार आहोत. संपूर्ण कर्जमाफी होणे गरजेचे आहे.

या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, ॲड. प्रकाश पाटील, शंकरराव माने देशमुख, अर्जुनसिंह मोहिते पाटील, दत्तात्रय भिलारे, मामासाहेब पांढरे, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, मालोजीराजे देशमुख आदींसह शेतकरी सभासद उपस्थित होते.

प्रश्न 1 : श्री शंकर साखर कारखान्याला किती कर्ज मिळाले?
एकूण ११३ कोटी रुपये.

प्रश्न 2 : कर्जातून किती खर्च मशिनरी दुरुस्तीसाठी करण्यात आला?
४२ कोटी रुपये.

प्रश्न 3 : शेअरची रक्कम शेतकऱ्यांकडून कशी वसूल होणार आहे?
फक्त शेतकऱ्यांच्या संमतीनेच वसूल होईल.

प्रश्न 4 : ऊस वजनासाठी कोणती सुविधा देण्यात आली आहे?
मोरोची येथे मोफत वजन काट्याची सुविधा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT