Ranjitsinh Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjitsinh Naik-Nimbalkar : 'मी शब्द पाळणारा खासदार...' उदाहरण देऊनच सांगितले निंबाळकरांनी...

Sangola Politics : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा जाहीर सत्कार...

दत्तात्रय खंडागळे

Sangola News : 'मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मी म्हणालो होतो, की या पुढच्या निवडणुका पाण्याच्या प्रश्नावर होणार नाहीत. तो शब्द मी पूर्ण केला आहे. निवडणुकीमध्ये माझ्या जिभेवर सरस्वती होती की काय माहीत. मी ज्या ज्या कामांच्याबद्दल बोललो ते काम सध्या पूर्णत्वास जात आहे. मी शब्द पाळणारा खासदार आहे,' असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सत्कार समारंभात मांडले.

कडलास (ता. सांगोला) येथील ग्रामस्थांनी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा ढोल-ताशाच्या गजरामध्ये जेसीबीवरून पुष्पवृष्टी करीत स्वागत करून सत्कार केला. यावेळी निंबाळकर बोलत होते. खासदार निंबाळकर यांनी टेंभू योजनेमध्ये माणनदीचा समावेश केला, म्हैशाळ योजनेतून कोरडा नदीवर आणि अप्रुका नदीवरील सर्व बंधारे भरून देणार आहेत. तसेच वंचित गावांचा टेंभू योजना व म्हैशाळ योजना यामध्ये समावेश केला आहे. या कामांमुळे ग्रामस्थांनी खूश होत खासदार निंबाळकरांचे जंगी स्वागत केले. यावेळी आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केलेल्या कामामुळे भाजपचीच देशात सत्ता येणार आहे. माढा लोकसभेचा उमेदवार मी किंवा इतर कोणीही असो, ही जागा जिंकून मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत,' असे निंबाळकर म्हणाले.

यावेळी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले की, 'कडलास हे गाव क्रांतिकारक गाव आहे. या गावाने बैलगाड्यांचा मोर्चा सांगोला तहसील कचेरीवर काढून प्रभावी आंदोलन केले होते. तसेच या गावातील मंडळींनी जनावरासह तहसील कचेरीवर दहा-पंधरा दिवसाचे उपोषण केले होते. याअगोदर सांगोल्यामध्ये कर्तृत्वाचा दुष्काळ असल्यामुळे तालुक्याला पाणी येऊ शकले नाही. गेल्या चार वर्षांच्या काळामध्ये सांगोला तालुक्यातील पाण्याच्या सर्व योजना जवळपास मार्गी लागल्या आहेत.'

'मी आणि आमदार शहाजीबापू एकही गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. टेल टू हेड पाणी देण्यासाठी बापू आणि मी प्रयत्न करणार आहे. बापू आमदार झाल्यापासून तालुक्यामध्ये विकासाचा डोंगर उभा राहताना आपल्याला दिसून येत आहे,' असे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील (Deepak Salunkhe) या कार्यक्रमात म्हणाले.

यावेळी सुभाष इंगोले, अरुण बिले, दादासाहेब लवटे, नवनाथ पवार, अप्पासाहेब देशमुख, बाळासाहेब सरगर, सुनील पवार, डॉ. विजय बाबर, दीपक पवार, गुंडा खटकाळे, युवराज पाटील, संजय देशमुख, समीर पाटील, महादेव कांबळे, दिगंबर भजनावळे, संतोष जाधव, अमोल यादव, सतीश लेंडवे, संतोष गायकवाड, पप्पू लेंडवे, महेश लेंडवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Edited by : Rashmi Mane

R...

SCROLL FOR NEXT