Ranjeetsingh Naik Nimbalkar, Vijaysinh Mohite–Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics News : मोहिते पाटील समर्थकांच्या निवासस्थानी खासदार निंबाळकर, भेटीने चर्चांना उधाण

Harshal Bagal

Solapur Politics Latest News : सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या मोहिते पाटील व विद्यमान माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची अंतर्गत धुसफूस सुरू असताना मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक जिंती गटातील नेते सविताराजे भोसले व खासदार निंबाळकर यांची नुकतीच एक भेट झाली. या भेटीमध्ये मोहिते पाटलांच्या समर्थक असलेल्या राजे भोसले यांच्या निवासस्थानी खासदार निंबाळकर गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. परंतु, ही कोणती राजकीय भेट नव्हती. आपण विकास कामांच्या मुद्द्यावरती चर्चा केली. तसेच ही भेट राजकीय अनुषंगाने नव्हती, असे स्पष्टीकरण निंबाळकर व राजे भोसले यांनी दिले.

माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जिंती येथे राजेभोसले परिवाराच्या निवासस्थानी सदिच्छ भेट दिली. यावेळी श्रीमंत शहाजीराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. (Mohite Patil ) दरम्यान, करमाळा तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पश्चिम भागातील जिंती पोलिस ठाणे निर्माण करण्यासाठी रेल्वे प्रशासन व ग्रामीण पोलिस यांच्या समन्वयातून शिफारस होणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पारेवाडी, गुलमोहरवाडी, भगतवाडी, जिंती रोड, कावळवाडी बोगदा, रामवाडी रेल्वे गेट बोगदा अर्धवट कामे, निकृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण झालेले असताना नव्याने साईड भिंत उभारणे, उत्तम गुणवत्तेचे काँक्रिटीकरण व इतर कामे व्हावीत यावर यावेळी चर्चा झाली आहे. संग्रामराजे राजेभोसले, अॅड. पृथ्वीराज राजेभोसले, अॅड. गिरीजाराजे भोसले व जिंतीचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT