Narendra Patil : सातारा लोकसभेसाठी नरेंद्र पाटलांनी पुन्हा ठोकले शड्डू ; माध्यमांसमोर केलं सूचक विधान, म्हणाले...

Satara Lok Sabha election : सातारा लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे.
Narendra Patil
Narendra PatilSarkarnama
Published on
Updated on

Satara News : सातारा लोकसभेसाठी भाजप, शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) यांच्या महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपचे नेते माजीआमदार नरेंद्र पाटील यांनी ही जागा भाजपचीच असून भाजपने उमेदवारी दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार आहे, असे सांगून एकप्रकारे बॉम्बच टाकला आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 25 वर्षपूर्ण झाल्याबद्दल महामंडळाच्या लोगोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी नागपूर विधानभवन परिसरात नरेंद्र पाटील यांच्याशी सरकारनामाच्या प्रतिनिधीने संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Patil
Mahavikasaghadi : कोल्हापुरात 'मविआ'ला 'उमेदवार मिळेना, चर्चेचं काथ्याकूट सुरूच

यावेळी सातारा लोकसभेच्या जागेबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ''2019च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले हे भाजपमधून(BJP) निवडणूक लढणार होते, पण त्यांचे मनपरिवर्तन झाल्याने त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली.''

''त्यानंतर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा लोकसभेची निवडणूक लढणे महत्वाचे होते, त्यामुळे भाजपमध्ये काम करत असताना सातारा लोकसभेसाठी मला संधी दिली गेली. त्या निवडणुकीत मी उदयनराजे भोसले यांचे आव्हान स्वीकारून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत मला साडेतीन ते चार लाख मते मिळाली.''

याशिवाय ''पराभव झाल्यावरही मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आजही भाजपमध्ये काम करत आहे. आता येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात जय्यत तयारी केली आहे, त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी मला पक्ष व देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी उमेदवारी देतील अशी आशा आहे.'' असंही ते म्हणाले.

याचबरोबर, ''जर संधी मिळाली तर मी निवडणूक लढण्यास तयार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही मला साथ मिळेल.'' अशी अपेक्षा नरेंद्र पाटील(Narendra Patil) व्यक्त केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com