Ranjitsinh Naik Nimbalkar-narayan Patil
Ranjitsinh Naik Nimbalkar-narayan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'नारायण पाटलांच्या पाणीप्रश्नावर शिंदे-फडणवीसांकडे बैठक लावणार'

सरकारनामा ब्यूरो

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा (Karmala) तालुक्याच्या उत्तर भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील (Narayan patil) हे वारंवार मागणी करत आहेत. माजी आमदार नारायण पाटील यांच्या मागणीचा विचार करून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक लावण्यात येईल , अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. (Ranjitsinh Naik Nimbalkar will hold a meeting with Shinde-Fadnavis on Narayan Patil's water issue)

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सध्या करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी करमाळा येथील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी (ता. २ सप्टेंबर) माजी आमदार नारायण पाटील यांनी खासदार नाईक निंबाळकर यांची भेट घेतली . त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. खासदार नाईक निंबाळकर म्हणाले की, माजी आमदार नारायण पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश करावा. करमाळा तालुक्याच्या उत्तर भागाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी करत आहेत.

माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की, करमाळा तालुक्याच्या उत्तर भागाला पाणी द्यायचे असेल तर ते पाणी आम्हाला उजनीतून उचलण्याची परवानगी द्यावी. करमाळा तालुक्याला कुकडीचे पाणी कधीही पुरेशा प्रमाणात पाणी मिळालेली नाही. कुकडी धरणापासून दोनशे ते अडीचशे किलोमीटरवर करमाळा तालुका आहे , त्यामुळे सहा टीएमसी पाणी तालुक्यासाठी  मंजूर असून कधीच करमाळा तालुक्याला पुरसे पाणी मिळाले नाही. हेच सहा टीएमसी पाणी उजनीत सोडून आम्हाला उजनीतून पाणी उचलण्याची परवानगी दिली, तर करमाळा तालुक्यातील उत्तर भागाला  याचा मोठा फायदा होणार आहे.

अनेक वर्षापासून आपण ही मागणी करत आहोत. या योजनेमुळे कोर्टी, हुलगेवाडी, कुसकरवाडी, गोरेवाडी, मोरवड, रायगाव, फुंदेवाडी, वंजारवाडी, रोशेवाडी, भोसे, पिंपळवाडी, वीट, विहाळ, अंजनडोह, पोंधवडी, झरे आदी भागाला याचा मोठा फायदा होणार आहे. करमाळा तालुक्याच्या उत्तर भागातील शेतीच्या पाण्यासाठी मी मांडलेली संकल्पना माझ्या विरोधकांनाही कळत नकळत पटू लागली आहे, त्यामुळे तेदेखील मी मांडलेल्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचे समर्थन करू लागले आहेत, असे नारायण पाटील यांनी नमूद केले.

माजी आमदार नारायण पाटील यांच्या या मागणीचा विचार करून  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावर तात्काळ बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT