मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही अन्‌ लोकसभाही लढणार नाही : फडणवीस

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची विद्यमान मंत्री मंडळात वर्णी लागणार का, या प्रश्नावर मात्र फडणवीस यांनी मौन बाळगणे पसंत केले.
 Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

पुणे : मी पुण्याचा (pune) पालकमंत्री (guardian minister) होणार नाही आणि पुण्यातून लोकसभेच निवडणूकही (LokSabha Election) लढवणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (I will not be guardian minister of Pune and will not contest Lok Sabha : Fadnavis)

फडणवीस हे पुण्यात इलेक्ट्रीक बसच्या चार्जिंग स्टेशनच्या उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील घोषणा केली. नवे सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याची चर्चा रंगली होती. तसेच, ब्राह्मण महासंघाने देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेचे तिकिट द्या, अशा मागणीचे पत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठविले हेाते. त्यामुळे फडणवीस पालकमंत्री होणार आणि लोकसभा निवडणूक लढविणार, याबाबत चर्चा रंगली होती. त्याला खुद्द फडणवीस यांनीच पूर्णविराम दिला आहे.

 Devendra Fadnavis
हरियाणातील नेत्याने आपला पक्ष केला राष्ट्रवादीत विलीन!

फडणवीस म्हणाले की, तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे काय? मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही आणि पुण्याची लोकसभाही लढवणार नाही. त्या फक्त माध्यमातील चर्चा आहेत. पक्षात त्याबाबत कसलीही चर्चा नाही. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची विद्यमान मंत्री मंडळात वर्णी लागणार का, या प्रश्नावर मात्र फडणवीस यांनी मौन बाळगणे पसंत केले.

 Devendra Fadnavis
मुरलीधर मोहोळ राज्याच्या राजकारणात ? : नव्या नियुक्तीमुळे तर्क-वितर्कांना उधाण

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटीबाबत फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्याशी माझी भेट झालेली नाही. एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी मी पोहोचलो होते. नेमके त्याचवेळी तेही पोहोचले. मात्र, त्यांची आणि माझी कुठेही भेट झालेली नाही.

 Devendra Fadnavis
काँग्रेस नेते अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीसांची भेट; दोघांमध्ये अर्धा तास गुफ्तगू

पुण्याचे दोन भाग होणार, हा नवीन वाद कशाला काढता आहात. जेव्हा करायचे आहे, तेव्हा बघू. राज्य सरकारपुढे आज तरी पुण्याबाबत असा कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. मात्र, आज कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही. मुंबईची तिसरी महानगरपालिका करण्याचा देखील कुठलाही विचार सध्या नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका. आपल्याला विकासाकडे जायचं आहे, असे फडणवीसांनी या वेळी निक्षून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com