Jaykumar Gore -Ranjitsinh Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Politic's : रणजितसिंह निंबाळकर आज देशाचे मंत्री असते; पण त्यांचा पराभव करणाऱ्यांना सोडणार नाही : गोरेंचा मोहिते- पाटील, रामराजेंना इशारा

Jaykumar Gore On Ranjitsinh Nimbalkar Defeat : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवामुळे माढा मतदारसंघाचे नुकसान झाल्याचा दावा करत, पराभवाला जबाबदार असलेल्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला.

Vijaykumar Dudhale

Satara, 02 August : मी आजपर्यंत जे संकल्प केले, त्यातील फक्त एका संकल्पात मी अपयशी ठरलो आहे. तो रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा खासदार करण्यात अयशस्वी झालो आहे. त्यामुळे फलटण, सातारा जिल्हा आणि माढा मतदारसंघाचं प्रचंड नुकसान झालं आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले असते तर कदाचित ते देशाच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असते. त्यांच्या पराभवाचे पाप ज्यांनी ज्यांनी केले आहे, त्यांना सोडणार नाही, असा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला.

फलटण पंचायत समितीच्या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री गोरे बोलत होते. गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवावर भाष्य करताना विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

ते म्हणाले, नगरपालिकेची चिंता आता मिटलेली आहे. फलटणचा प्रथम नागरिक म्हणून तुम्ही (समशेरसिंह निंबाळकर) पालखीचे स्वागत केले आणि ते पाहायला मी पाहिजे होतो. कारण ते स्वप्न मी फार पूर्वीपासून पाहिलेले आहे.

फलटणची नगरपालिका, पंचायत समिती, आमदारकी आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा खासदार झालेले पाहायचं आहे. मी आजपर्यंत जे संकल्प केले, त्यामध्ये फक्त एका संकल्पात मी अपयशी झालो आहे. तो रणजित निंबाळकरांना पुन्हा खासदार करण्यात अयशस्वी झालो आहे. त्यामुळे फलटण, सातारा जिल्ह्यासह माढा मतदारसंघाचं मोठं नुकसान झालं आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खासदार होण्यापासून थांबवणारी ताकद आता राहिलेली नाही आणि ती मी ठेवणारही नाही. त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर हे त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत. ते खासदार होतीलपण. त्यांना अजून फार मोठं राजकीय आयुष्य आहे.

पण त्यांनी (रामराजे निंबाळकर) कोणाशी (मोहिते पाटील) तरी संगनमत करून जे पाप केलं आहे. पण दादा त्यांच्याही (मोहिते पाटील) दुकानाला टाळे लावण्याची वेळ आली आहे आणि यांच्याही (रामराजे नाईक निंबाळकर) दुकानाला टाळे लागलेले आहे. त्यामुळे फार काही विषय आता राहिलेला नाही, असा दावा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT