

Pune, 02 August : माझा पुतण्या लॉमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. त्याच्याकडे उत्कृष्ट वक्तृत्व होतंच, त्यामुळे तो राजकारणात येईल असं मला वाटलं होतं. माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं मला वाटतं, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी पुण्यात केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित देवाभाऊ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बाळासाहेब फडणवीस पुण्यात बोलत होते. बाळासाहेब फडणवीस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका आहेत.
बाळासाहेब फडणवीस म्हणाले, माणसाच्या जीवनात कलाटणी मिळते. नागपूरमधील एका प्रसिद्ध वकिलांकडे देवेंद्र फडणवीस काम करत होता आणि त्यानंतर तो जनसंघात गेला. माझा पुतण्या देवेंद्र फडणवीस कधीही घरात राजकारण करत नाही. तो मोकळा असतो.
याच कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस वयाच्या 27 व्या महापौर झाले आहेत. राज्य महापौर परिषदेचे देवेंद्र फडणवीस हे अध्यक्ष होते. फडणवीस यांना दैवशक्ती मिळाली आहे. सर्व बाबतीत ते सर्वगुणसंपन्न आहेत.
मी असा एक मुख्यमंत्री पाहिला ते पेन काढायचे आणि निवेदनावर खुणा करायचे, असे अनेकांना म्हणजे ९९ जनांना करायाचे आणि सांगतो म्हण्याचे? मुख्यमंत्री नाव घेणं चंद्रकांत पाटील यांनी टाळलं. मात्र, देवेंद्र फडणवीस हे पेन काढून 60 कोटी निधींच्या पॅसेजवर सही करतात, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे चार वाजता प्रेस कॉन्फरन्स कर्जमाफीसाठी घ्यायला लावली होती. मराठा आरक्षणसंदर्भात किती मुख्यमंत्री होऊन गेले. सामान्य माणसाची परिस्थिती सुधारली, असं काम त्यांनी केलं का. मतं मिळविण्यासाठी मराठा आरक्षण दिलं नाही तर समाजाचे कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यासाठी काम केलं
मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास केला म्हणून आरक्षण टिकलं. मात्र, मी उद्धव ठाकरे यांना मी दोष देत नाही. कोविड काळ होता, त्यामुळे सर्वोच न्यायालयात आरक्षण टिकलं नाही, असेही त्यांनी म्हटले आहे, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.