Kolhapur News: गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने आमदार राजेश क्षीरसागर आणि राज्य सरकारवर टीकेची जोड उठवणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी अखेर सोमवारी(ता.7) आमदार क्षीरसागर यांची माफी मागितली आहे. त्यासंदर्भातील व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमातून व्हायरल करत दिलगिरी व्यक्त केल्याचे कबुली दिली आहे.
राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांना डिवचत आले आहेत. आठवडाभरापूर्वी त्यांनी रंकाळ्याच्या एका कामासंदर्भात बारा कोटीचा विषय समाज माध्यमांसमोर आणला होता. तर आमदार क्षीरसागर यांचे चिरंजीव नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांचा गोव्यामधील कसीनो खेळतानाचा व्हिडिओ माध्यमांसमोर आणला होता.
कोल्हापूर शहरातील एका कामकाजा संदर्भात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे स्टिंग ऑपरेशन देखील समाज माध्यमांत व्हायरल केल्यानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली होती. इतकेच नव्हे तर आमदार क्षीरसागर हे राहत असलेल्या इमारतीमधील एका कौटुंबिक विषयासंदर्भातील मारहाणीचा व्हिडिओ देखील त्यांनी समाज माध्यमातून उघड केला होता. चार दिवसांपूर्वी राठोड या सराफ व्यावसायिकाच्या प्रकरणात देखील रविकिरण इंगवले यांनी स्वतःहून उडी घेत आमदार क्षीरसागर यांच्यावर टीका केली होती.
या संपूर्ण प्रकारामुळे राजकीय बदनामी शिवाय कौटुंबिक बदनामी आमदार क्षीरसागर यांची झाली होती. सातत्याने होत असलेल्या टीका आणि आरोपांमुळे क्षीरसागर हे देखील संतप्त झाले होते. 2 सप्टेंबर रोजी शक्ती भोसले यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये रविकिरण इंगवले यांच्यावर तक्रार दाखल केले होते. त्यानंतर या प्रकरणाला आणखीन एक वेगळे वळण लागले.
तर दोन दिवसांपूर्वी शहरातील एका मोठ्या कुटुंबातील व्यक्तीचा कारागृहात असताना आपणच एका दुर्धर आजाराचे इंजेक्शन देऊन मारून टाकला असल्याचा संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून इंगवले यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी काही नगरसेवकांनी केली होती. या संपूर्ण प्रकारामुळे इंगवले यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यामुळे आज्ञाचस्थळावरून त्यांनी क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे.
दरम्यान, शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांचा गट फुटल्यानंतर फेमस झालेल्या नेत्यांनी रविवारी आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली. इंगवले यांचे ते जवळचे नातेवाईक असल्याने त्यांनी या प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तास चर्चा संबंधित नेत्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या जवळ केली. त्यानंतर हा माफीनामा इंगवले यांच्याकडून देण्यात आल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.