Ravindra Dhangekar News : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवणुकीत दणदणीत विजय मिळवल्यामुळे आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य लोणारी समाज व सांगोला तालुका लोणारी समाज सेवा संघाच्या वतीने हा सत्कार 7 मे रोजी सांगोला शहरात होणार आहे. या सत्कार समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहणार आहेत.
आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे अखिल लोणारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात लोणारी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेषता पश्चिम महाराष्ट्रातील माणदेश पट्ट्यात लोणारी समाजाची संख्या खुप मोठ्या प्रमाणावर आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातुन निवडणुक लढवून आमदार रवींद्र धंगेकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
सर्वत्र चर्चिले गेलेल्या या निवडणुकीत धंगेकरांनी घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील लोणारी समाजात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. आमदार धंगेकरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्याची तयारी महाराष्ट्र राज्य लोणारी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
धंगेकरांनी जे यश खेचुन आणले आहे त्यास साजेसा त्यांचा सन्मान सोहळा करण्याचे समाजाच्या वतीने ठरवण्यात आले आहे. या सन्मान सोहळ्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याकडे लोणारी समाजाच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांच्या हस्ते धंगेकर यांचा सत्कार व्हावा ही इच्छा केली होती.
साळुंखे यांच्या पुढाकाराने लोणारी समाजाच्या शिष्टमंडळाने नुकतीच पवार यांची भेट घेवुन त्यांना या सत्कार सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. लोणारी समाजाने दिलेले हे निमंत्रण पवार यांनी स्वीकारले आहे. दीपक साळुंखे यांच्यासोबत लोणारी समाजाच्या शिष्टमंडळामध्ये नवनाथ राणगट, नामदेवराव बजबळकर, विलास घेरडे, भिमराव घेरडे, अशोक नरळे (फलटणे), गणपत महांकाळ, विजय भुत्ता आदि लोणारी समाज बांधवांचे शिष्टमंडळ उपस्थीत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.