Jayashree Madan Patil Meets NCP's Nishikant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayashree Patil : काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटलांचं ठरलं? निशिकांत पाटलांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

Jayashree Madan Patil Meets NCP's Nishikant Patil : सांगलीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. कधीकाळी जिल्ह्यात प्रवेश देखील न मिळालेल्या पक्षाकडे आज चार माजी आमदारांसह अनेक मोठ्या नेत्यांची ताकद आहे. आता यात भर पडताना दिसत आहे.

Aslam Shanedivan

Sangli NCP Politics : सांगली जिल्ह्यात महायुतीने मोठे राजकीय भूकंप घडवून आणले आहे. नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने नेते निशिकांत पाटील यांनी येथे चार माजी आमदारांना फोडले होते. त्यामुळे भाजपसह ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला फटका बसला होता. यानंतर आता निशिकांत पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर पक्ष प्रवेशाच्या दुसऱ्या अध्यायाला सुरूवात केली आहे. या अध्यायाच्या पहिल्याच टप्प्यात त्यांनी काँग्रेसला धक्का देताना बंडखोर नेत्या तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील यांना आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याला यश येताना दिसत असून काहीच दिवसात त्यांचा प्रवेश होईल अशा शक्यता निर्माण झाली आहे. यातच जयश्री पाटील यांनी निशिकांत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्या निमित्ताने भेट घेतल्याने आणि त्यांचा सत्कार केल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधात बंडखोरी केल्यानंतर श्रीमती जयश्री पाटील यांनी राजकीय भूमिका सावधपणे घेण्याचे ठरवले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन महिन्यांवर आल्या आहेत. परिणामी, त्यांनी निर्णय करावा लागणार आहे. त्याबाबत कळंबी येथील फार्म हाऊसवर बैठक झाली होती. कार्यकर्त्यांची मते आजमावण्यात आल्यानंतर बहुतांश कार्यकर्त्यांनी अजितदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती दिल्याची माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर निशिकांत पाटील यांची जयश्रीताईंनी भेट घेतली. ही भेट अत्यंत महत्वाची ठरत असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुढील दहा-पंधरा दिवसांत सांगली दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यात काही महत्वाचे प्रवेश होऊ शकतात. जयश्रीताईंनी तसा निर्णय घ्यावा, असा आग्रह होऊ शकतो. त्याबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती कळत आहे.

निशिकांत पाटील यांनी यावेळी मदनभाऊंनी निगडीत काही आठवणी सांगितल्या. दोन्ही कुटुंबांचे ऋणानुबंध कायम असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, इस्लामपुर नगरपालिकेचे माजी नगरसेवक वैभव पवार उपस्थित होते.

संजय पाटील यांची भेटही महत्वाचीच

निशिकांत पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांचीही भेट घेतली होती. त्यांनीही निशिकांत पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संजय पाटील तांत्रिकदृष्ट्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीतच आहेत. मात्र ते तिथे रमताना दिसत नाहीत. निशिकांत पाटील यांच्याकडून काकांना ताकदीने एकत्र येण्याचे आवाहन केले होते. यामुळे आगामी स्थानिकच्या आगोदर निशिकांत पाटील यांनी टाकलेले राजकीय डाव योग्य पडल्यास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद जिल्ह्यात वाढणार आहे.

दरम्यान जिल्ह्यात ठाकरे गटाचा चेहरा असणारे डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज मुंबईत संध्याकाळी 5 वाजता प्रवेश करणार आहेत. यामुळे ठाकरे गटाला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. यातच आता काँग्रेसच्या महिला नेत्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा चर्चा जोर धरू लागली आहे. यामुळे सांगलीचे राजकारण आता चांगलेच तापलेलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT