MLA Shivendraraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosale  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivendraraje Bhosale' Criticism: आतातरी सुधारावे, गांधी-नेहरुंची काँग्रेस संपली; शिवेंद्रराजेंची टीका

Umesh Bambare-Patil

Satara Savarkar Gaurav Yatra : काँग्रेस व राहूल गांधी Rahul Gandhi यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत. त्यांचा निषेध करण्यासाठी भाजपच्यावतीने साताऱ्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे. महापुरुषांना कमी लेखणे व त्यांचा अपमान करणे यातून काँग्रेसची देशात वाताहात झाली आहे. आतातरी काँग्रेसने सुधारावे. महात्मा गांधी व पंडीत नेहरुंची काँग्रेस संपली आहे, अशी टीका भाजपचे सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी केली आहे.

भाजपच्यावतीने सातारा शहरात आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेत मोठ्यासंख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिस करमणूक केंद्रापासून यात्रेला सुरवात झाली.

यात्रा पोवई नाक्यावर आल्यावर तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, काँग्रेस व राहूल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत.

महापुरुषांना कमी लेखणे व त्यांचा अपमान करणे यातून काँग्रेसची देशात वाताहात झाली आहे. आतातरी काँग्रेसने सुधारावे. महात्मा गांधी व पंडीत नेहरुंची काँग्रेस आता संपली आहे. संभाजीनगर नामकरणाच्या विरोधातही खत पाणी घालण्याचे काम काँग्रेस करत आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करण्याचाच हा त्यांचा प्रकार आहे. त्याचा दुसरा भाग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्र व देशातील हिंदू धर्माविषयी प्रेम असलेली जनता आगामी निवडणूकांत काँग्रेसला मतांच्या रुपाने झटका देईल. सातारकरांच्या व जावळीकरांच्या वतीने आम्ही काँग्रेस व राहूल गांधी यांचा निषेध करतो. आता त्यांनी सावरकरांचा बदनामी करण्याचा प्रकार थांबवावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT