Shambhuraj Desai News : करोडो हिंदू जनता बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर प्रेम करते. त्या प्रत्येकाचा बाळासाहेब ठाकरेंवर Balasaheb Thackeray अधिकार आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित आणि संकुचित ठेऊ नये. त्यामुळे कोणी कोणाच काय चोरले, असे बोलणे उद्धव ठाकरेंच्या Udhav Thackeray मुखातून शोभत नाही, असा टोला सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. काल झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेचा धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे नाव त्याच्याबरोबरच आता तुम्हाला दुसऱ्यांचे बापाचे नाव सुद्धा लागते का, असा सवाल उपस्थित केलेला होता. या त्यांच्या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुखामध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य आश्चर्यकारक आहे, असे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे कौटुंबिक वारसदार आहेत. परंतु करोडो हिंदू जनता बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर प्रेम करते. त्या प्रत्येकाचा बाळासाहेब ठाकरेंवर अधिकारआहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित आणि संकुचित ठेऊ नये. त्यामुळे कोणी कोणाच काय चोरले असे बोलणे उद्धव ठाकरेंच्या मुखातून शोभत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीबाबत संजय राऊत यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना टिव्हीवर दाखवायचं कमी करा. तुम्ही पत्रकार मंडळींनी स्वतः सर्वे करा. संजय राऊत बोलायला लागल्यावर लोक चॅनल बदलतात. त्यांना लोक आता कंटाळली आहेत. मी स्वतः च एक सर्वे करतो, असे सांगून संजय राऊत यांना तुम्ही टिव्ही वर दाखवन बंद करा, अशी विनंती त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.