shahaji patil
shahaji patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शहाजीबापू, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा अन्‌ मतदारसंघात लक्ष द्या : शिवसेनेकडून प्रत्युत्तर

भारत नागणे

पंढरपूर : शिवसेनेत (shivsena) बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासोबत गेलेले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) हे मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यांच्या या टीकेला आता पंढरपूर (Pandharpur) येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडूनही सोशल मिडीयातून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि आमदार शहाजी पाटील यांच्यातील वाद आणखीच पेटण्याची शक्यता आहे. (Reply from Pandharpur Shiv Sena to Shahajibapu Patil criticizing Thackeray)

shahaji patil

अलीकडेच आमदार शहाजी पाटील यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत थेट ‘मातोश्री’लाच आव्हान दिले होते. त्यातच आमदार पाटील यांच्याकडून शिवसेना खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यावर टीका करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

shahaji Patil

काय झाडी, काय डोंगर, काय हाटील... या डायलाॅगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले आमदार पाटील हे आता शिंदे गटाचे वक्ते म्हणून राज्यभर फिरु लागले आहेत. सभेत बोलताना शिवसेनेवर टिका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. पाटील यांच्या टीकेमुळे दुखावलेले पंढरपुरातील शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी चांगले आक्रमक होत पुढे सरसावले आहेत. युवा सेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख गणेश इंगोल यांनी सोशल मीडियातून आमदार पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा...काय दारु...काय चकना.. काय ते ५० खोके समंद कसं ओके...’ ‘बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी भेटेल..आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करु,’ ‘टक्केवारी घेऊन आधी स्वतःच घर पूर्ण करा...बायकोला ५० खोक्यातून साडी घेऊन द्या, अशी बोचरी टीका करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्हायरल केल्या आहेत.

shahaji Patil

दुसरीकडे, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनीही आमदार पाटील यांच्यावर शेलक्या शब्दात टिका केली आहे. आमदार शहाजी पाटील हे बोलका बाहुला असून त्यांना ५० खोक्यांचे टाॅनिक मिळाले आहे. त्यामुळेच ते राज्यभर बोलक्या बाहुल्याचे प्रयोग करत आहेत. उध्दव ठाकरे यांच्यावर बोलण्याची आमदार पाटलांची लायकी नाही, अशी टिकाही शिेंद यांनी केली आहे. सेनेच्या पदाधिकार्यांनी आमदार पाटलांच्या विरोधात सोशल मीडियातून टीकेच्या पोष्ट व्हायरल केल्या असून त्या पोष्टची पंढरपुरात जोरदार चर्चा रंगली आहे. युवसेनेच्या टीकेला आमदार शहाजी पाटील काय उत्तर देतात, हे पाहावे लागणार आहे.

shahaji Patil

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT