जलसंपदा खाते येणार सोलापूरच्या वाट्याला; भाजपच्या वरिष्ठ आमदाराचे नाव आघाडीवर

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा पुढचा मंत्रिमंडळ विस्तार ऑक्टोंबरमध्ये होणार असून त्यावेळी २४ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे.
BJP
BJP

सोलापूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde)-देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा पुढचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) ऑक्टोंबरमध्ये होणार असून त्यावेळी २४ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. यामध्ये नशीबवान आमदार कोण ठरणार, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिंदे गटातील मंत्रिपदाची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपकडे असलेल्या गृहनिर्माण, जलसंपदा आणि ऊर्जा खात्यासाठी मंत्री निवडण्यात येणार आहेत. जलसंपदा खातं (Water resource Minister) सोलापूर (solapur) जिल्ह्याच्या वाट्याला येण्याची शक्यता असून भाजपच्या एका वरिष्ठ आमदाराचे नाव त्यासाठी चर्चेत आहे. (Water resource ministry will come to Solapur; Name of senior BJP MLA in front)

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी शिंदे-फडणवीसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. त्यात शिंदे आणि फडणवीस गटाकडून १८ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी देण्यात आली होती. पहिल्या विस्तारात संधी न मिळाल्याने शिंदे आणि भाजपतील काही आमदार नाराज झाले आहेत. शिंदे गटातील आमदारांनी ती बोलून दाखवली होती. भाजपच्या आमदारांनी मात्र पक्षादेशाच्या नावाखाली शांत राहणे पसंत केले होते. आता या नाराज आमदारांना खूष करण्यासाठी दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे.

BJP
PUNE BJP : मुरलीधर मोहोळांकडे आता नेत्यांच्या सभा-संमेलनाची जबादारी !

भाजपकडून सध्या महसूल, उच्च व तंत्रशिक्षण, वने, आदिवासी विभाग, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या खात्यांचे मंत्री नेमण्यात आलेले आहेत. शिंदे गटाकडून पाणी पुरवठा व स्वच्छता, बंदरे व खनिकर्म, अन्न व औषध, रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उद्योग, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, कृषी, शालेय शिक्षण, सहकार, राज्य उत्पादन शुल्क, पर्यटन, महिला व बालकल्याण या विभागांचा कार्यभार मंत्र्यांकडे सोपविण्यात आलेला आहे.

BJP
Jayant Patil : नागपूर दौऱ्यात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांचा घेतला क्लास...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या नगरविकास, परिवहन, मदत व पुनर्वसन (आपत्ती व्यवस्थापन), मृद व जलसंधारण आणि अल्पसंख्यांक या खात्यांचा कारभार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त, गृहनिर्माण, जलसंपदा व ऊर्जा ही खाती आहेत. शिंदे गटातील आणखी चार जणांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागणार असून भाजपकडून गृहनिर्माण, जलसंपदा व ऊर्जा या खात्यांचे मंत्री निवडले जाणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील एका वरिष्ठ आमदाराचे नाव आघाडीवर असून त्यांच्याकडे जलसंपदा विभागाची जबाबदारी येऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com