Karad Maratha Kranti Morcha sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vinayak Mete : मराठ्यांना आरक्षण हीच मेटेंना श्रध्दांजली; कऱ्हाडात मराठा क्रांतीतर्फे अभिवादन...

मेटे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूची suspicious accidental death चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करावी Strict action should be taken against the culprits, अशी मागणी मराठा बांधवांनी Maratha Morcha केली.

हेमंत पवार

कऱ्हाड : मराठा आरक्षण प्रश्नासाठी विनायक मेटे यांनी आयुष्यातील 40 वर्षे पणाला लावली. त्यांच्या कारकिर्दीत मराठा समाजाला दोनवेळा आरक्षण लागू केले गेले. पण, न्यायालयांकडून ते रद्द करण्यात आले. ही वस्तुस्थिती स्विकारुन विद्यमान सरकारने मराठा समाजाला 50 टक्के मर्यादेत व ओबीसी प्रवर्गातूनच संविधानिक मराठा आरक्षण लागू करणे, हीच मेटे यांना खरी श्रध्दांजली ठरेल, अशी मागणी कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज करण्यात आली.

आमदार (कै) विनायक मेटे यांना कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून अभिवादन करुन आदरांजली वाहण्यात आली. अमर रहे अमर रहे... विनायक मेटे अमर रहे, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे.. नाही कोणाच्या बापाचे, एक मराठा, लाख मराठा... या घोषणांनी शासकीय विश्रामगृह परिसर दणाणून गेला. यावेळी झालेल्या श्रध्दांजली सभेत अनेक मराठा बांधवांनी मेटे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बीड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातल्या एका शेतकरी कुटुंबातली व्यक्ती मराठा समाजासाठी प्रामाणिक लढा उभारतो. शिवसंग्राम नावाचे राज्यव्यापी संघटन उभारतो आणि एक दोन नव्हे तर पाचवेळा विधान परिषद आमदार होतो. मराठा आरक्षण प्रश्नी विधानपरिषद गाजवतो असा नेता पुन्हा होणार नाही.

मेटे यांच्याकडून ज्या पोटतिकडीने मराठा समाजाचे प्रश्न मांडले गेले, ती आक्रमकता व ती अभ्यासपूर्ण मांडणी करणारे मराठा समाजातले एकमेव आमदार ते होते. त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षात मराठा समाजाला दोन वेळा मराठा आरक्षण लागू केले गेले. पण दोन्हीही वेळा ते चूकीच्या पध्दतीने लागू केले गेल्यामुळे न्यायालयांकडून रद्द करण्यात आले.

ही वस्तुस्थिती स्विकारुन विद्यमान सरकारने मराठा समाजाला 50 टक्के मर्यादेत व ओबीसी प्रवर्गातूनच संवैधानिक मराठा आरक्षण लागू करणे हीच मेटे यांना खरी श्रध्दांजली ठरेल असाही निर्धार यावेळी करण्यात आला. मेटे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूची चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मराठा बांधवांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT