विनायक मेटे अनंतात विलीन; अखेरचा निरोप देतांना कार्यकर्त्यांना भावना अनावर

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Vinayak Mete
Vinayak Metesarkarnama
Published on
Updated on

Vinayak Mete : बीड : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विनायक मेटे यांना अखेरचा निरोद देण्यासाठी मोठ्या प्रमामात जनसागर लोटला होता. मेटे यांना अखेरचा निरोप देताना कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या.

या वेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विनायक मेटे यांच्यावर बीडमधील उत्तमनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मेटे यांना अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

Vinayak Mete
मेंटेंबद्दल बोलताना सदाभाऊंना अश्रू अनावर

रविवारी (१४ ऑगस्ट) पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मेटे यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांचे निधन झाले. मेटे यांच्या निधनामुळे मराठवाड्यासाठी झटणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला. मराठा आरक्षणासह अनेक विषयांवर मेटे यांनी आंदोलने केली. त्यांच्या निधनामुळे आंदोलनाचा आवाज शांत झाला, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचे पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये काल रात्री आणण्यात आले होते. त्यानंतर बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रस्त्यावर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात आणण्यात आली. येथे विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Vinayak Mete
ITMS : मेटेंच्या अपघाती मृत्यूनंतर सरकारने घेतला 'हा' निर्णय, अपघातांना लागणार 'ब्रेक'

बीडहून मराठा आरक्षणासंदर्भातली बैठकीसाठी मेटे मुंबईला चालले होते. पण पहाटेच्या सुमारास भातण बोगदाजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. तातडीने उपचार मिळू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अपघाता संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com