Ahmednagar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीचे आरक्षण जाहीर

राज्याच्या ग्रामविकास विभागाने अहमदनगर जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण काढले आहे.

गोरक्षनाथ बांदल

Ahmednagar : राज्याच्या ग्रामविकास विभागाने अहमदनगर जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण काढले आहे. जिल्ह्यातील चार पंचायत समितींचे सभापतीपद खुले राहणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

जिल्ह्यात अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव, नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड या चौदा पंचायत समित्या आहेत. ग्रामविकास विभागाने पंचायत समिती आरक्षण जाहीर केले आहे.

अनुसूचित जाती-एक, अनुसूचित जाती (महिला)-एक, अनुसूचित जमाती-एक, अनुसूचित जमाती (महिला)-एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग- दोन, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)- दोन, सर्वसाधारण महिला-तीन तर खुल्या गटासाठी चार जागा आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, निवडणूक उपजिल्हाधिकारी आणि राजकीय पक्ष, सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थित आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT