नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक सभेत पुन्हा गदारोळ

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 103 व्या वार्षिक सभेतही गोंधळाची परंपरा कायम राहिली.
Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar News
Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar NewsSarkarnama
Published on
Updated on

अशोक निंबाळकर

Ahmednagar District Primary Teachers Bank : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 103 व्या वार्षिक सभेतही गोंधळाची परंपरा कायम राहिली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिव्हिडंट, प्रवासभत्त्याच्या मुद्द्यावरून हैराण केले. अध्यक्षांच्या लांबलेल्या भाषणावरही त्यांनी सडकून टीका केली. सुमारे दोन तास चाललेल्या भाषणावर आक्षेप घेत सभेत गोंधळ घातला. व्यासपीठावर येत त्यांनी माईक हिसकावून घेतला. सर्वच मंडळांच्या नेत्यांनी व पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने सभा सुरळीत झाली. रात्री उशिरापर्यंत ही सभा सुरू होती.

बँकेची निवडणूक प्रक्रिया न्यायालयात गेली आहे. उद्या (सोमवारी) या याचिकेवर सुनावणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेली सभा चांगलीच वादळी ठरली. सकाळी दहाच्या सुमारास सभेस सुरूवात झाली. तेव्हापासूनच विरोधी गुरूकुल, सदिच्छा आणि इब्टाचे मंडळाचे कार्यकर्ते, नेते वेगळ्या बाजूला बसले होते. तर सत्ताधारी मंडळाचे समर्थक शिक्षक दुसऱ्या बाजूला बसले होते. सुरवातीपासूनच विरोधक घोषबाजी करीत होते. अध्यक्ष किसनराव खेमनर यांना अहवालातील प्रश्न विचारत होते. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत भाषण सुरू ठेवले.

Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar News
यामुळे नगरची जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंक पुन्हा ठरतेय चर्चेचा विषय

सुमारे दोन तास भाषण चालल्यानंतरही ते थांबायचे नाव घेत नसल्याने विरोधक राजेंद्र शिंदे, नवनाथ आडसूळ, संजय कळमकर व्यासपीठावर गेले. त्यांनी माईकचा ताबा घेतला. गुरूमाऊलीचे बापूसाहेब तांबे यांना सभासदांना बोलू देण्याची विनंती केली. तांबे यांनी अध्यक्ष भाषण थांबवतील. तुम्ही सभेला गालबोट लागेल असे वर्तन करू नका, असे आवाहन केले. मात्र, विरोधकांचा गोंधळ वाढतच गेला. मग सत्ताधाऱ्यांचे समर्थकही उभे राहून विरोधकांना खाली बसवण्यासाठी हटून बसले. यात महिला कार्यकर्त्याही मागे नव्हत्या. गोंधळ वाढल्याने पोलिसांनी सभासद शिक्षकांना शांत बसण्याचे आवाहन केले. तांबे यांनी विरोधकांना बोलण्यास सांगितल्यानंतर सभा सुरळीत झाली.

Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar News
अहमदनगर जिल्ह्यात शिक्षक भरतीत मोठा घोटाळा!

कळमकर म्हणाले, कोविड काळातही तुम्ही प्रवासभत्ता घेतला. सभासदांच्या पावत्या ओरड झाल्यावर दिल्या. काव्यकुंज पुस्तक दिले नाही. संचालक मंडळाशिवाय कोणाचेही फोटो अहवालात छापू नका. आम्ही तुम्हाला चकणे म्हणून तुम्ही आम्हाला हेकणे म्हणू नका सभासदांचा विचार करा.

आडसूळ यांनीही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. घड्याळ, पुरस्कारावरील घोटाळ्याचा हिशोब द्या, अशी मागणी केली. शिंदे यांनी अहवालावरून सत्ताधाऱ्याचे वाभाडे काढले. सत्तेवर आल्यापासून ठेवी वर्ग करण्याचा सपाटा लावल्याचा त्यांनी आरोप केला. लाखो रूपये खर्चून घेतलेले सॉफ्टवेअर काहीच कामाचे नाही.

Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar News
अपघातग्रस्तांसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ठरले देवदूत

21 बोके एकदम ओके

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या एकदम ओकेचा फिव्हर या सभेतही दिसला. 21 बोके एकदम ओके... अशा घोषणा विरोधकांकडून दिल्या जात होत्या. सत्ताधारीही त्यांना प्रतिघोषणा करून उत्तर देत होते.

प्रवासभत्ता का घेतला

सत्तेवर येताना प्रवासभत्ता घेणार नसल्याचे सांगितले होते. तरीही प्रवासभत्ता का घेतला, अशी विचारणा केल्यानंतर अध्यक्ष खेमनर म्हणाले, पहिल्या दीड वर्षात कोणताही भत्ता घेतला नाही. नंतरच्या काळात भत्ता घेतला. परंतु तो प्रतिसंचालक अवघा 1366 रूपये आहे. या उत्तरानंतरही विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले.

सभेतील महत्त्वाचे ठराव

डिव्हिडंट 10.10 टक्के

ठेवी - 1275 कोटी

वाहन, शैक्षणिक, गृहकर्ज - 8

नफा - 9 कोटी 76 लाख

वीस वर्षांतील उच्चांकी नफा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com