Satara News : खंडाळा तालुक्याच्या (Khandala Taluka) डोळ्यादेखत आमच्या हक्काचे पाणी फलटण व बारामतीला पवारांनी पळविले होते. यापूर्वीच्या शासनाने व मख्यमंत्र्यांनी निरा देवघर प्रकल्पाला निधीला दिला नव्हता. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या सरकारने निरा देवधर ३९७२.८२ कोटींचा उपलब्ध केला आहे. त्यामुळे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळणार आहे, अशी माहिती बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव Purushottam Jadhav यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
निरा देवधर प्रकल्पाबाबत आज मुंबईत बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी ३९७६.८२ कोटींची निधी मंजूर केला आहे. याबाबतची माहिती देताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले, गेली ५० वर्षे आम्ही या प्रकल्पाच्या रखडलेल्या कामांबाबत झगडत होतो. त्यासाठी २७ पाणी परिषदा घेतल्या. उलट आमच्या हक्काचे पाणी पवारांनी फलटण व बारामतीला पळवून नेले.
यासंदर्भात आम्ही नायगांवच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांना निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी इतक्या मोठ्याप्रमाणात निधी मंजूर केला आहे. खंडाळा तालुक्यातील १४ गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. हे युती सरकारचे श्रेय आहे.
यापूर्वी जिल्ह्यातील अनेकजण मुख्यमंत्री झाले पण, त्यांनी या कामांसाठी निधी दिला नाही. तसेच महाविकास आघाडी सरकारनेही याकडे दूर्लक्ष केले. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या सरकारने निरा देवघरसाठी ३९७२.८२ कोटींचा उपलब्ध केला आहे. त्यामुळे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रम....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस येत्या नऊ फेब्रुवारीला असून जिल्ह्यात वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्याप्रमाणात साजरा केला जाणार असल्याचे सांगून पुरुषोत्तम जाधव म्हणाले, त्यादिवशी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेच्यावतीने प्रतापगड व रायगडावर स्वच्छता मोहिम राबवली जाईल. तसेच गाव तेथे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची शाखा स्थापन केली जाणार आहे.
कराडला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, महआरोग्य मेळावा, मसूरला खोखो स्पर्धा, कराडला सहाशे विद्यार्थी पालकत्व रणजित पाटील घेणार आहेत. रहिमतपूर येथे मतिमंद मुलाना कपडे व खाऊचे वाटप, वृद्धाश्रमात खाऊ व फळांचे वाटप, पाटणला सहाशे विद्यार्थी वह्या व दप्तर वाटप, शासकिय रुग्णालय सातारा येथे रुग्णांना फळे वाटप, कोयना, पाटण, कराड, सातारा, शिरवळ, येथे आरटीओचा कॅम्प घेतला जाणार आहे. करहर, मेढा व केळघर येथे महाआरोग्य मेळावा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.