Rohini Khadse Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohini Khadase : 'ज्यांच्या हातात सुरक्षा त्यांच्याकडून दडपशाही...' ; रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

Satara NCP News : रोहिणी खडसे या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधला.

उमेश भांबरे :सरकारनामा

Satara NCP News : सध्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. पाच ते दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार होत आहेत. मात्र, दोषींवर तातडीने कारवाई होत नाही. महाराष्ट्राला लाजिरवाणे वाटाव्या अशा या घटना आहेत, की ज्यांच्या हातात सुरक्षा आहे, त्यांच्याकडून दडपशाहीचे राजकारण होत आहे, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी लगावला.

राष्ट्रवादी महिला आघाडीचा मेळावा व संघटनबांधणीसाठी रोहिणी खडसे या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, कविता म्हेत्रे, संगीता साळुंखे, समिंद्रा जाधव, संजना जगदाळे, दीपक पवार, राजकुमार पाटील उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजकारणातील घडामोडी पाहता महिला सुरक्षित आहेत का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, सध्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. पाच ते दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार होत आहेत. मात्र, दोषींवर तातडीने कारवाई होत नाही. मागील आठवड्यात महिला पोलिसांनीच अधिकाऱ्यांकडून अत्याचार झाल्याची तक्रार केली होती. पण, त्यानंतर त्यांना त्यांच्या वक्तव्यापासून माघार घ्यावी लागली होती. महाराष्ट्राला लाजिरवाण्या वाटणाऱ्या या घटना आहेत, की ज्यांच्या हातात सुरक्षा आहे, त्यांच्याकडून दडपशाहीचे राजकारण होत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

साताऱ्यात लोकसभेला किंवा विधानसभेला महिलांना संधी मिळणार का ?, यावर खडसे म्हणाल्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सर्वाधिक महिला आहेत. गेल्या दहा वर्षांत भाजपच्या काळात सर्वात कमी महिला लोकप्रतिनिधी निवडून गेल्या आहेत. आजपर्यंत पवारसाहेबांचा महिलांना पाठिंबा मिळाला आहे. भविष्यातही आम्ही महिलांना जास्तीत जास्त संधी देऊ. भाजपला श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेचा फायदा होईल का, यावर त्या म्हणाल्या, याबाबत सांगता येणार नाही, पण श्रीराम हे महाराष्ट्राचे दैवत आहे. तो सर्वांच्या मनात आहे.

Edited By : Rashmi Mane

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT