Satara Voter list : तब्बल 1 लाख 7 हजार 112 मृत मतदार

Lok Sabha Election : सातारा जिल्ह्यातील मतदारयाद्या अद्ययावत करताना मृत मतदारांची नावे वगळली, 70 हजार नवमतदारांची नोंदणी...
Satara Voters
Satara VotersSarkarnama
Published on
Updated on

उमेश बांबरे

Satara News :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत नवमतदारांचा टक्का वाढला आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचवेळी एक धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारयाद्या अद्ययावत केल्या जात आहेत. यात साताऱ्यातील (Satara) मोहिमेत तब्बल 1 लाख 7 हजार 112 मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. म्हणजेच एवढे मतदार (Voter) कमी झाले आहेत, तर 18 ते 19 वयोगटांतील 33 हजार 922 मतदारांची वाढ झाली आहे.

Satara Voters
Congress Meeting: पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून रिंगणात...; काँग्रेसच्या बैठकीत उमेदवारी...

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सातारा जिल्ह्यातील 25 लाख 46 हजार 463 मतदारांची यादी अंतिम करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

यामध्ये 12 लाख 97 हजार 27 पुरुष, तर 12 लाख 49 हजार 345 स्त्री मतदार आहेत. मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेत नवमतदारांचा टक्का वाढला आहे. 18 ते 19 वयोगटांतील 33 हजार 922 मतदारांची भर पडली आहे, तर 20 ते 29 वयोगटात 36 हजार 984 मतदार वाढले आहेत.

एकूण 1 लाख 7 हजार 112 मृत मतदारांची नाव वगळण्यात आली असून त्यातील 38 हजार 321 मतदार 80 पेक्षा अधिक वयाचे होते. वंचित समाजघटकांचा विचार करता मतदारयादीत 793 लोकांना ओळखपत्रे, 1,127 लोकांना जातीचे दाखले, 116 कुटुंबांना रेशनकार्ड, 123 लोकांना आधारकार्डचे वाटप करण्यात आले आहे. मतदारयादीत 91 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डुप्लिकेट फोटो असलेले 23 हजार मतदार

मतदारयादीत 23 हजार 927 मतदारांचे डुप्लिकेट फोटो आढळळे. त्यानुसार 8 हजार 767 मतदारांची नावे वगळण्यात आले आहेत. काही नावे आणि पत्त्याचा तपशील समान आढळून आल्याने सखोल सर्वेक्षण करून 3 हजार 537 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

उत्कृष्ट कामाबद्दल गौरव

पुणे विभागात मतदारनोंदणी, पुनर्निरीक्षणात चांगले काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कऱ्हाडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, निवडणूक उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना निवडणूक आयोगाकडून उत्कृष्ट कामाबद्दल पुरस्कार मिळाला आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Satara Voters
Solapur New Voters : सोलापूर जिल्ह्यात वाढले 1 लाख नवे मतदार; पुरुषांच्या तुलनेत महिला 4386 ने वाढल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com