Sangli News: तासगांव नगरपालिका निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी व शेवटच्या क्षणी प्रचंड नाट्यमय राजकीय घडामोडीत घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते अजय पाटील यांनी नाराज होत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश शहरात एक चर्चेचा विषय बनला आहे. अजय पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणाला तारणार, कोणाला मारणार, यावर सध्या अंदाज बांधले जात आहेत.
अजय पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) शहरातील बडे नेते मानले जातात. यापूर्वी त्यांनी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. शहराच्या काही भागांत त्यांचे प्रभावक्षेत्र आहे. ‘उमेदवारी देतो, अर्ज भरा, ’ असे सांगून अर्ज भरण्याच्या दोन तास आधी त्यांना उमेदवारी नाकारली गेली. त्यानंतर त्यांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला आणि ज्योती पाटील यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली.
या घडामोडी घडत असताना निश्चित करण्यात आलेल्या काही उमेदवारांनी निवडणूक लढवण्याचे नाकारले. शिवाय उमेदवारी नाकारली गेलेल्या काही जणांनी ज्योती पाटील यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याने निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसला ‘पॅचअप’ करावे लागणार असल्याचे चित्र आहे. छाननीनंतर निवडणुकीच्या रिंगणात लढत कशी होते, यापेक्षा अजय पाटील यांच्या या बंडखोरीचा फटका कोणाला बसणार, याचीच चर्चा शहरात सध्या सुरू आहे.
आमदार रोहित पाटील (Rohit Patil) यांनी या घडामोडीकडे सध्या दुर्लक्ष केल्याचे दिसते. मात्र निर्माण झालेली पोकळी भरून काढावीच लागेल. अनेक नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी कशी दूर केली जाते, हेही पाहावे लागणार आहे.
प्रचाराला अवघे दहा दिवस मिळणार आहेत. त्यातही नाराजी दूर करत प्रचारात आघाडी घेणे अशी मोठी कसरत आमदार रोहित पाटील यांना करावी लागणार आहे. दुसरीकडे, माजी खासदार संजय पाटील यांनी स्वाभिमानी आघाडीच्या माध्यमातून रोहित पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.