Election Commission: निवडणूक आयोगाला 'टार्गेट' करणाऱ्या राहुल गांधींच्या अडचणी वाढणार; 272 अधिकाऱ्यांनी उचललं मोठं पाऊल

Vote Chori : आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीसाठी तब्बल 272 दिग्गज अधिकारी मैदानात उतरले आहेत. यात 16 न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकारी आणि 133 सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी यांनी मोठं पाऊल उचललं आहे.
Election Commission, Rahul Gandhi
Election Commission, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत भाजपसोबत मिळून निवडणूक आयोगानं मतचोरी केल्याच आरोप करत राहुल गांधी यांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) मतचोरीच्या आरोपानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचदरम्यान, आता प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीसाठी तब्बल 272 दिग्गज अधिकारी मैदानात उतरले आहेत. यात 16 न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकारी आणि 133 सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी यांनी मोठं पाऊल उचललं आहे. या सर्व आजी-माजी सनदी अधिकारी यांनी राहुल गांधी अन् काँग्रेसच्या आरोपांचं खंडन केलं आहे. तसंच राहुल गांधी हे निवडणूक आयोगाची बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

देशभरातली 16 न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकारी आणि 133 सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी अशा 272 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र मोट बांधत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हा निवडणूक आयोगाला (Election Commission) बदनाम करत असल्याचा आरोप केल्यामुळे आता मतचोरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

सनदी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्रात भारतीय लोकशाहीवर बळाचा उपयोग नाही. पण लोकशाहीच्या अनेक आधारभूत संस्थांविरोधात भडकाऊ विधानं करत हल्ला चढवण्यात येत आहे. काही नेते हे नाटक वठवत आहेत आणि खोटे आरोप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Election Commission, Rahul Gandhi
Ajit Pawar : कोकणात मतदानाआधीच राष्ट्रवादीने उधळला विजयी गुलाल! पेण नगर पालिकेत अजितदादांचा उमेदवार बिनविरोध

कधी भारतीय लष्कराच्या पराक्रम आणि त्यांच्या साहसावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. न्यायपालिका, संसद आणि तिथे काम करणाऱ्यांवरही टीका करण्यात आली. आता राहुल गांधी आणि काँग्रेसच्या निशाण्यावर निवडणूक आयोग असल्याचंही पत्रात नमूद केलं आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका करताना 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत मिळून निवडणूक आयोगानं मतं चोरल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी केला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासेही केले होते.

Election Commission, Rahul Gandhi
Sharad Pawar News : निवडणुकीच्या धामधुमीतच शरद पवारांना धक्का; पक्षात काहीच काम नसल्याचे सांगत बड्या नेत्याची सोडचिठ्ठी...

राहुल गांधी यांनी शुक्रवारी एक्स सोशल मीडियावर पोस्ट अपलोड करत निवडणूक आयोगाला पाच प्रश्न विचारले आहेत. त्यांनी यात भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. "भारतातील लोकशाही खूप महत्त्वाची आहे. तिची चोरी होणं खूप भयंकर आहे. आता जनता बोलत आहे, खूप झालं, असं म्हटलं.

1. विरोधकांना डिजिटल मतदार यादी का मिळत नाही? तुम्ही काय लपवत आहात?
2. CCTV आणि व्हिडिओचे पुरावे का मिटवले जात आहेत? कोणाच्या सांगण्यावरून हे सुरू आहे?
3. खोटं मतदान आणि मतदार यादीमध्ये गडबड का केली गेली?
4. विरोधी नेत्यांना का धमकावलं जात आहे? त्यांना का घाबरवलं जात आहे?
5. स्पष्ट सांगा, निवडणूक आयोग आता भाजपचा एजंट बनला आहे का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com