Sanjay Patil, Rohit Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Patil Vs Sanjay Patil : रोहित पाटलांचा खासदार संजय पाटलांना इशारा; म्हणाले, 'तुमचा इतिहास...'

Maharashtra Government : दुष्काळात सरकार भीक दिल्यासारखे पाणी देते

Sunil Balasaheb Dhumal

राहुल गडकर

Sangli Political News : 'पाण्यावरून राजकारण करणार नाही, असं मी ठरवलेले आहे. पण मी निश्चितपणे सांगतो, टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रस्तावास मान्यता मिळेल, त्या दिवशी विरोधकांना उत्तर देईन. ते म्हणाले होते स्वर्गीय आर. आर. पाटील यांचा इतिहास बाहेर काढू; पण मी जाहीरपणाने सांगतो, त्यावेळी तुमचा इतिहास बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' असा इशारा खासदार संजय पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पाटलांनी दिला. (Latest Political News)

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात ते बोलत होते. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 18 गावांत पाण्यासाठी सांगली जिल्ह्यातील राजकारण पेटले आहे. भाजपचे खासदार संजय पाटील विरुद्ध आमदार सुमन पाटील यांच्यात टेंभू पाणी योजनेवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.

या गावांना पाणी मिळण्यासाठी आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या वेळी त्यांनी खासदार पाटलांनी दिवंगत आर. आर. पाटलांवर केलेल्या टीकेचा हिशेब करत सरकारवर कडाडून टीका केली.

रोहित पाटील म्हणाले, "या 18 गावांतील जनतेला हक्काचे पाणी मिळण्यासाठी गेली कित्येक वर्षे लढा देत आहोत. दुष्काळाची झळ पोहोचते, त्यावेळी सरकार भीक दिल्यासारखे आम्हाला पाणी देते. तासगावच्या पूर्व भागाला आणि कवठेमहांकाळमधील गावांना जाणूनबुजून सरकार दुर्लक्ष करते का? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तासगाव तालुका द्राक्ष पिकासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, पाणी नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे हक्काचे पाणी मिळेपर्यंत या उपोषणाला बसणार आहाेत."

शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी या आंदोलनाबाबत विचारणा केली आहे. सरकारने तोडगा काढला नाही तर ते स्वतःदेखील या प्रश्नासाठी सांगलीत येतील, असा विश्वास रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, टेंभू योजनेच्या पाण्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळवला आहे. असे असले तरी विस्तारित टेंभू योजनेच्या तृतीय सुधारित प्रशासकीय अहवालास मान्यता मिळावी. जोपर्यंत याला मान्यता मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका आमदार सुमन पाटील यांनी घेतली आहे. (Maharashtra Political News)

या गावांचा पाण्यासाठी संघर्ष

सांगली जिल्ह्यातील तासगावमधील सावळज, सिद्धेवाडी, दहिवडी, जरंडी, यमगरवाडी, वायफळे, बिरणवाडी, डोंगरसोनी, वडगाव, लोकरेवाडी, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली तिसंगी, घाटनांद्रे, रायवाडी, केरेवाडी आणि शेळकेवाडी या गावांना अनेक वर्षापासून पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT