BJP Political News : छत्तीसगड, राजस्थानमधील भाजपची यादी 'फायनल'; 'या' उमेदवारांना प्राधान्य

Chhattisgarh, Rajsthan Assembly Election : दिल्लीतील बैठकीत छत्तीसगडच्या ९० पैकी ६९ जागांवर शिक्कामोर्तब
Rajsthan, Chhattisgarh, BJP
Rajsthan, Chhattisgarh, BJPSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने जोरात सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून याकडे पहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. (Latest Political News)

दिल्लीत भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा जागांबद्दल चर्चा करण्यात आली. या ठिकाणच्या उमेदवारांबद्दल मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. त्यावेळी छत्तीसगड, राजस्थानमधील भाजपचे उमेदवार फायनल करण्यात आले असून, लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

Rajsthan, Chhattisgarh, BJP
Cabinet Expansion : गोगावले, शिरसाट, कडूंची आता तरी मंत्रिमंडळात वर्णी लागणार का ?

दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत छत्तीसगडच्या ९० पैकी ६९ जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. छत्तीसगडमध्ये २१ जागांची पहिली यादी यापूर्वीच प्रसिद्ध केली आहे. त्यासोबतच या वेळी राजस्थानमधील ६५ जागांवर बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती देण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या या निवडणुकीत जिंकून येणाऱ्याच उमेदवाराला तिकीट देण्यावर भाजपचे प्राधान्य असणार आहे.

केंद्रीय निवड समितीने यादी फायनल केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिरवा कंदील दर्शविल्यानंतर लवकरच दोन्ही राज्यांतील याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. सध्या पितृपक्ष सुरू असल्याने आता यादी जाहीर केली जाणार की, १३ ऑक्टोबरनंतर यादी जाहीर केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Rajsthan, Chhattisgarh, BJP
Maratha Vs OBC : उपकाराची भाषा करत जरांगे पाटलांचे छगन भुजबळांना आवाहन; म्हणाले, 'ओबीसी नेत्यांनो परतफेड...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com