-हेमंत पवार
Karad NCP News : संजय शिरसाट स्वतः प्रवक्ते असल्यामुळे त्यांच्या पोटात कुठेतरी दुखतंय. त्यांना मंत्री व्हायचं आहे, ते स्वतः बोललेले आहेत. आम्ही कुठेही पदासाठी, मंत्रीपदासाठी लाचार झालेलो नाही. आम्ही नियत कुठे विकलेली नाही. तेव्हा तुम्ही कुठलेही राजकीय पतंग उडवू नका, असा टोला आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना लगावला.
कोल्हापुर Kolhapur दौऱ्यावर जाण्यापुर्वी आमदार रोहित पवार Rohit Pawar कऱ्हाड (जि.सातारा) येथे काहीकाळ थांबले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी नगरसेवक सौरभ पाटील, समीर कुडची, संजय पिसाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार पवार म्हणाले, पवार कुटुंबातील व्यक्तीला संधी मिळाल्यानंतर अध्यक्ष व्हायचं असतं तर मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो असतो. महाविकास आघाडी सरकारमध्ये मी मंत्री होऊ शकलो असतो. पण मी झालो का ? मला मंत्री कुठे व्हायचं असत, पदासाठी मी लढत असतो तर मी आज सत्तेच्या बाजूला असतो.
आम्ही पदांसाठी कोठेही भेदभाव करत नाही. परंतु मला पद नको विचार महत्त्वाचा आहे. संजय शिरसाट स्वतः प्रवक्ते असल्यामुळे त्यांच्या पोटात कुठेतरी दुखतंय. त्यांना मंत्री व्हायचं आहे ते स्वतः बोललेले आहेत. आम्ही कुठेही पदासाठी, मंत्रीपदासाठी लाचार झालेलो नाही, आम्ही नियत कुठे विकलेली नाही. तेव्हा तुम्ही कुठलेही राजकीय पतंग उडवू नका.
भरतीत काळाबाजार...
सध्या सुरू असलेल्या भरतीमध्ये काळाबाजार सुरू आहे, सरकार मुद्दाहुन खाजगी कंपन्यांकडून भरती करत आहे. पेपर अनेक वेळा फुटलेले आहेत. त्यामध्ये एफआयआर दाखल होवुनही सरकार उलट पेपर कुठे फुटला आहे, असे म्हणत असेल तर कुठेतरी चुकीचं घडतंय आणि त्याची पाठराखण सरकार करतंय.
पुढच्या काही दिवसात यामध्ये सुधारणा न झाल्यास शिक्षक भरती, प्राध्यापक भरतीत जो काही काळाबाजार चालला आहे. या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.