Satara Political News : लोकसभेसाठी लक्ष्मण माने महाविकास आघाडीकडे या जागा मागणार...

Laxman Mane सातारा शासकीय विश्रामगृहात लक्ष्मण माने यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संघटनेचे सरचिटणीस नारायण जावलीकर, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
Laxman Mane, Sharad Pawar
Laxman Mane, Sharad Pawarsarkarnama

Satara Political News : भटक्या विमुक्त जमाती संघटनेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना पाठिंबा दिला असून आमची संघटना महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळे आघाडीने आम्हाला लोकसभेची एक, विधानसभेच्या सहा जागा द्याव्यात. अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू, अशी घोषणा भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केली. तसेच पवार भाजपबरोबर गेल्यास मी त्यांच्याविरोधात जाईन, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सातारा Satara शासकीय विश्रामगृहात लक्ष्मण माने Laxman Mane यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संघटनेचे सरचिटणीस नारायण जावलीकर, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी व लोकशाही संविधानाचा शोध घेण्यासाठी येत्या १४ ऑक्टोबरपासून भटक्या विमुक्त जमाती संघटना राज्यात शोधयात्रा काढणार आहे. या यात्रेची सुरवात लातूर Latur येथून तर सांगता मुंबईत होईल.

श्री. माने म्हणाले, भटक्या विमुक्त जमाती संघटनेची बैठक झाली. यामध्ये भटक्या विमुक्तांच्या न्याय, हक्कासाठी आणि लोकशाही संविधानाचा शोध घेण्यासाठी १४ ऑॅक्टोबरपासून राज्यात शोधयात्रा सुरू करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातून यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर या यात्रेचा समारोप सहा डिसेंबरला मुंबईत होईल.

ही यात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यातून जाणार आहे. आतापर्यंत कोणत्याही पक्षाला भटक्या विमुक्तांचे प्रश्न सुटावेत असे मनापासून वाटलेले नाही. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही हा समाज उपेक्षितांचे जगणे जगत आहे. यासाठीच आम्ही महाविकास आघाडीकडे लोकसभेची लातूर किंवा यवतमाळची जागा मागत आहोत.

Laxman Mane, Sharad Pawar
Satara Congress News : कॉंग्रेस वर्किंग कमिटीतही डावलले; पृथ्वीराज चव्हाणांचे दिल्लीतील वजन घटलं?

तसेच विधानसभेचे सहा मतदारसंघ आम्हाला हवे आहेत. सहा प्रादेशिक विभागातील कोणतेही मतदारसंघ दिले तर आमचे उमेदवार निवडून येतील. या शोध यात्रेदरम्यान, लोकांना भाजपला किंवा संघाला मतदान करु नका असे आम्ही सांगणार असल्याचे स्पष्ट करुन माने म्हणाले, संघाच्या विचारधारेने देशाचे नुकसान केलेले आहे. देशातील हे सरकार घालविल्याशिवाय गप्प बसणार नाही. देशातील या सरकारने पुढील निवडणूक यंत्राद्वारे न घेता मतपत्रिकाद्वारे घ्यावी अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

तर मी पवारांविरोधात जाईन....

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यातील वाद खरा आहे का, या प्रश्नावर श्री. माने म्हणाले, पवार कुटुंबातील हे भांडण वैचारिक असून अजित पवार यांच्यानंतर शरद पवार भाजपबरोबर जातील का, या प्रश्नावर शरद पवार राजकारण सोडून घरी थांबतील. पण, भाजपबरोबर कधीही जाणार नाहीत. ते गेले तर त्यांच्याविरोधात मी जाईन, असे ठाम मत श्री. माने यांनी व्यक्त केले.

Edited By : Umesh Bambare

Laxman Mane, Sharad Pawar
Yavatmal BJP News: ‘आऊटगोइंग’ माहीत नसलेल्या भाजपचा गटनेताच लावला गळाला, अन...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com