Rohit Pawar, Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan NCP News : रोहित पवारांनी शंभूराज देसाईंना डिवचले; म्हणाले, पालकमंत्री माण तालुक्यात किती वेळा आले होते...

Rohit Pawar दहिवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आमदार रोहित पवार बोलत होते

Umesh Bambare-Patil

Maan NCP News : दहिवडी येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना डिवचले. श्री. पवार म्हणाले, माण, खटाव तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून येथील परिस्थितीची पहाणी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी तुमचे पालकमंत्री माण तालुक्यात किती वेळा आले होते. त्यांच्या या प्रश्नाला पालकमंत्री देसाई काय उत्तर देणार याची उत्सुकता लागली आहे.

दहिवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP कार्यकर्ता संवाद मेळाव्यात रोहित पवार Rohit Pawar बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, , जिल्हाध्यक्ष सुनिल माने, डॉ. सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

आमदार रोहित पवार म्हणाले, सातारा हा शौर्य आणि मनात स्वाभिमान बाळगणारा जिल्हा आहे. त्यामुळे तुम्हांला शौर्य,स्वाभिमान आणि अन्यायाविरोधात लढावे लागते हे सांगायला नवीन नाही. आज ज्या पद्धतीने भाजपकडून घर, पक्ष फोडले जात आहेत. त्याविरोधा आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

माण, खटाव तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून येथील परिस्थितीची पहाणी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी आपल्या सर्वांचे पालकमंत्री तालुक्यात किती वेळा आले होते, असा प्रश्न आमदार पवार यांनी करुन राज्य व केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, कांद्याचा प्रश्न असताना एक नेता जपानला गेला होता. दूसरीकडे एक नेता केंद्रात गेला. हे सारं लोक श्रेय घेण्यात मग्न आहेत. परंतू शेतक-यांवर आलेल्या संकटाचे त्यांना काही देणं घेणं नाही.

पवार तेल लावलेला पैलवान.....

पवार साहेबांनी शेतकऱ्यांवर कधीच अशी परिस्थिती आणली नाही, असे सांगत हा तेल लावलेला पैलवान आहे. आणि या देशातील ताकदीच्या विरोधात ते लढत आहेत. बाकी स्थानिक नेत्यांचे आमच्यावर सोडून द्या. मी आणि प्रभाकर देशमुख बघून घेऊ, अशी टिप्पणी आमदार राेहित पवार यांनी केली.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT