Usha Raut & Rohini Ghule
Usha Raut & Rohini Ghule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

रोहित पवारांनी नामदेव राऊतांच्या सुनेला बनविले कर्जतचे नगराध्यक्ष : रोहिणी घुले उपाध्यक्ष

नीलेश दिवटे

कर्जत ( जि. अहमदनगर ) - कर्जत नगरपंचायतची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने सत्ता खेचून आणली. या निवडणुकीत कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांची भुमिका महत्त्वाची ठरली होती. त्यांच्याच घरात पुन्हा एकदा कर्जतचे नगराध्यक्षपद देण्याचा निर्णय आमदार रोहित पवार यांनी घेतला. ( Rohit Pawar made Namdev Raut's daughter-in-law Mayor of Karjat: Rohini Ghule Vice President )

कर्जत नगराध्यक्षपदासाठी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार उषा राऊत यांचा आज एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित समजली जात होती. कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने 17 पैकी 12 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने 3 तर भाजपने 2 जागा जिंकल्या. नगराध्यक्ष निवडीसाठी कर्जत नगरपंचायतमध्ये आज विशेष सभा झाली. यात नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली.

कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यानंतर त्यांच्या सूनबाई उषा यांच्या रूपात दुसऱ्या पिढीला नेतृत्वाची संधी मिळाली. उषा राऊत या दुसऱ्यांदा जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून आल्या.

उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहिणी घुले यांचा अर्ज दाखल झाला होता. राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत असल्याने रोहिणी घुले यांची निवड निश्चित होती. त्यानुसार त्यांची निवड जाहीर करण्यात आली. या दोन्ही निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आतषबाजी केली.

या प्रसंगी आमदार रोहित पवार, नगराध्यक्ष नामदेव राऊत, प्रतिभा भैलुमे, शहर अध्यक्ष सुनील शेलार, विशाल मेहत्रे, प्रसाद ढोकरीकर, सचिन घुले, दीपक शिंदे, सचिन कुलथे, देवा खरात, गटनेते संतोष मेहत्रे, उपगटनेते सतीष पाटील, नगरसेवक अमृत काळदाते, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, नगरसेविका ज्योती शेळके, रोहिणी घुले, ताराबाई कुलथे, मोनाली तोटे, लंका खरात, सुवर्णा सुपेकर, छाया शेलार, आदी उपस्थित होते. या निवडी निश्चित समजल्या जात असल्याने मागील आठवड्याभरापासून कर्जत शहरात निवडीचे फ्लेक्स बोर्ड झळकत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT